पाचोरा नगरीत सात दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेकाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०४/२०२३
आजच्या परिस्थितीत मनुष्य धकाधकीच्या जीवनात तसेच पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागुन वाढती व्यसनाधीनता, भ्रमणध्वनीचा अनावश्यक वापर या कारणांमुळे आपल्या संस्कृतीच्या लांब जत असल्याचे जाणवते आहे. परंतु आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे नवीन पिढीवर चांगलं संस्कार व्हावेत याकरिता एकमेव उत्तम मार्ग म्हणजे संस्कार शिबिर, आपल्या धर्मग्रंथाचे वाचन, मनन, चिंतन व त्यातून मिळणाऱ्या शिकवणीतून बोध घेऊन तसे वर्तन करणे आपल्या भावी पिढीला गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन पाचोरा शहरातील पांडव नगरी (कॉलनी) परिसरातील पाताळेश्र्वर मंदिर जिर्णोद्धार समिती व ग्रिन ॲपल इव्हेंटस प्रस्तुत पाचोरा पत्रकार बांधवांच्या सहकार्याने पाचोरा नगरीत सात दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेकाचे आयोजन केले आहे.
( पाचोरा नगरीत सात दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेक सोहळ्यात हिंदू, मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन)
पाचोरा नगरीतील या सात दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेकाचे कार्यक्रमासाठी “एक लोटा जल, सारी समस्याओंका हल” हे ब्रीदवाक्य संपूर्ण जगभरात प्रसिद्ध करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कथावाचक भागवत भूषण परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांचे कृपाछत्र असलेले शिष्य परमपूज्य पंडित संजयजी शर्मा यांच्या पवित्र अमृतवाणीतून शिव महापुराण कथेचे श्रवण सुख घेण्याचे भाग्य सोबतच महारुद्र अभिषेक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे.
हा आठ दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेकाचा धार्मिक विधी दिनांक २९ एप्रिल २०२३ शनिवार पासून दिनांक ०६ मे २०२३ शनिवार पर्यंत संपन्न होणार असून या धार्मिक कार्यक्रमात सकाळी साडेसात वाजेपासून ते साडेनऊ वाजेपर्यंत अभिषेक, दुपारी चार वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत कथा वाचन अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे तसेच कथा समाप्तीनंतर दररोज उत्तराखंडमधील नैनीताल येथील सोनूजी बक्षी व त्यांच्या सहकाऱ्यांचा वतीने सुंदर झॉकीचा नयनरम्य सोहळा सादर करण्यात येणार आहे. तरी भाविक, भक्तांनी वेळेवर उपस्थित राहून या भव्यदिव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन लाभ घ्यायचा असल्यास सात दिवसीय महावृद्राभिषेक ११०००/०० रुपये एकदिवसीय महावृद्राभिषेक २५००/०० रुपये सहकुटुंब आरतीचा लाभ घ्यायचा असल्यास १५०००/०० रुपये असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तरी इच्छुक भाविक, भक्तांनी लवकरात, लवकर नाव नोंदणी करुन आपला सहभाग नोंदवावा म्हणजे जागेची उपलब्धता करणे सोयीचे होईल. यात विशेष म्हणजे प्रथम प्रवेश घेणाऱ्या भाविक, भक्तांना प्राधान्य तत्वावर संधी उपलब्ध करुन दिली जाणार असून अभिषेकामध्ये सहभागी असलेल्या भाविक, भक्तांना शिवलिंग, नंदी, नागदेवता, त्रिशूळ, जलधारी, जलधारी स्टॅन्ड व दोन वृद्राक्ष समितीतर्फे भेट देण्यात येणार आहेत.
पाचोरा नगरीतील या सात दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेक धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात दिनांक २९ एप्रिल २०२३ शनिवार रोजी दुपारी तीन वाजता शिव कॉलनी लगत असलेल्या पाताळेश्र्वर मंदिराचे पुजन करुन हिवरा नदी कृष्णापुरी पुलापासून ते श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक, भडगाव रोड अशी शोभायात्रा काढण्यात येणार असून भडगाव रोड येथील कैला देवी मंदिर परिसरात जवळील शिवप्रभू मैदानावर शोभा यित्रेचा समारोप होणार आहे. या शोभायात्रेत कलश घेऊन सहभागी होणाऱ्या इच्छुक महिलांसाठी १५१/०० रुपये नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून समितीच्या वतीने कलश देण्यात येणार आहे.
या शोभायात्रेत कलश घेऊन सहभागी होणाऱ्या माता, भगिनींनी विजय रेडीमेड भडगाव रोड, सत्यम मेडीकल मानसिंगका कॉर्नर, अग्रवाल एसटीडी जामनेर रोड, शरद ट्रेडींग कृष्णापुरी, दिपक पान सेंटर सिंधी कॉलनी, संजय पटवारी आठवडे बाजार, श्रध्दा मार्बल भडगाव रोड, उमिया मार्बल उल्हास टॉकीजजवळ, हिमाई टायर्स कृष्णापुरी बायपास हायवे रोड येथे आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नम्र आवाहन ~
या आठ दिवसीय शिवपुराण कथा व महारुद्र अभिषेकाचे कार्यक्रम प्रसंगी दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक दानशूर व्यक्तींनी महाप्रसादासाठी लागणारे साहित्य अथवा रोख रक्कम जमा करुन सहकार्य करावे तसेच ज्यांना शक्य होईल त्यांनी या ठिकाणी श्रमदान करुन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.