कुऱ्हाड येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता व श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने पुरणपोळीचा महाप्रसाद.
सुनील लोहार.(कुऱ्हाड प्रतिनिधी)
दिनांक~२२/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने नामांकित कीर्तनकारांची सात दिवस कीर्तने झाली. आज दिनांक सोमवार रोजी सकाळी रवींद्र महाराज तारखेडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यात दुग्ध शर्करा योग असा की आज २२ जानेवारी रोजी अखंड हिंदुत्वाचे दैवत श्रीराम प्रभू अयोध्येत विराजमान झालेत, या अनुषंगाने सप्ताह कमिटी तर्फे आज महाप्रसाद म्हणून पुरणपोळी असा गोड जेवणाचा कार्यक्रम येथील माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेला होता.
काल्याच्या कीर्तनानंतर सर्व गावकऱ्यांनी पुरणपोळीचा आस्वाद घेतला. त्यापूर्वी येथील राममंदिर परिसरात अयोध्या प्राणप्रति्स्थापना मुहूर्तावर भाजप शाखा कुऱ्हाड तर्फे दुपारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते . भाजपा शाखा तर्फे अनेक दिवसापासून प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने कुऱ्हाड येथे तयारी सुरू होती. गावातील मुख्य चौकात ठिकठिकाणी भगवे ध्वज, घरासमोर सडा रांगोळी टाकण्यात आलेली होती. काही ठिकाणी दिवे लावण्यात आले. हर घर श्रीराम असा नारा देत घरोघरी पेंटिंग करण्यात आली होती. आज राम मंदिरावर अनेक महिलांनी पूजाअर्चा करीत श्रीराम प्रभूच्या नाम घोष करत भजनावर पावली खेळत आनंद लुटला.
हा हरिनाम किर्तनसप्ताह कार्यक्रम व श्रीराम प्रभू प्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा. जिल्हा परिषद सदस्य संतोष चौधरी, भाजप गन प्रमुख जगदीश तेली, ग्रामपंचायत सदस्य अरुण बोरसे, सुधाकर महाजन, सरपंच डॉ.प्रदीप महाजन, उपसरपंच कौतिक पाटील, अशोक बोरसे,मनोज शिंपी, विलास चव्हाण, देवराम बोरसे, रामदास देशमुख ,विकास देशमुख तसेच गावातील भजनी मंडळ, तरुण कार्यकर्ते, गावातील सर्व ग्रामस्थ व महिलांनी विशेष सहकार्य केले.