जागतिक आरोग्य दिनानिमित्त सत्यजित न्यूज कडून, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविकेचा सत्कार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मा. श्री. विजय नाईक व आरोग्य सेविका श्रीमती जिजाबाई ढोले याचा आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त सत्यजित न्यूज कडून सौ. सुरेखा जैन, की. भाग्यश्री जैन व दिलीप जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मा. श्री. विजय नाईक व आरोग्य सेविका श्रीमती जिजाबाई ढोले यांनी कोरोनाच्या काळात अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा, वडगाव जोगे, सार्वे व जामने या कार्यक्षेत्रातील गावात दिवसरात्र मेहनत घेऊन हा परिसर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले.
तसेच वरील सातही गावात कुटुंबनियोजनचे उदिष्ट पुर्ण करुन गरोदर माता तपासणी व इतर आरोग्यविषयक जनजागृती करुन चांगल्याप्रकारे सेवा देत आहेत. याची दखल घेऊन तसेच जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून सत्यजित न्यूज कडून यांचा सत्कार करण्यात आला.