सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी श्री. अंबिका मातेची भरली खना, नारळाने ओटी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे गुढीपाडव्याच्या दिवशी जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अंबिका मातेचा यात्रा यात्रोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने महाराष्ट्रभरातून तसेच मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतात व आपली नवसपूर्ती करतात. याच दिवसाचे शुभमुहूर्तावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत व शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांच्या समवेत अंबे वडगाव येथे येऊन श्री. अंबिका मातेचे दर्शन घेऊन श्रद्धापूर्वक खन, नारळाने ओटी भरुन पूजन केले व अंबिका मातेचा आशिर्वाद घेतला.
यावेळी अंबे वडगाव येथील संजय पाटील, पितांबर सपकाळे, ॲड. मंगेशराव गायकवाड, नाना भाऊ वाघ, वाल्मिक देवरे, शामकांत वाघ, मधुकर मराठे, रामराम शिंदे, विनायकराव शळके, विकास चव्हाण, विकास (बापूजी) चव्हाण, राजेंद्र कौतीक मराठे, शरद पाटील संतोष कडू मराठे, आण्णा चव्हाण, आण्णा गायकवाड, शरद वाघ, रविंद्र खैरनार, शिवदास बाविस्कर, उत्तम चव्हाण, कैलास निकम, सुनिल शिंदे, व बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.