नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
कुडाळ
नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे मंगळवार दि.14 ते रविवार दि.19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत महाशिवरात्री उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह दशावतारी नाट्यप्रयोग तसेच महाशिवरात्री दिवशी रथोत्सव होणार आहे.
मंगळवार दि. 14 रोजी सकाळी 7 वा. महारुद्र प्रारंभ, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, 3 ते 7 वा. श्री पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळ (वेंगुर्ले)चे नाटक, रात्री 8 वा. पुराण – पालखीतून श्रींची मिरवणूक (गायक दिनू मेस्त्री), रात्री 10 वा. कीर्तन – ह. भ.प. श्री. भाटवडेकर बुवा, बुधवार दि. 15 रोजी सकाळी 7 वा.महारुद्र, श्री देव गावडोबा, श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ अभिषेक पूजन, श्री देवी सातेरी देवीकडे कुंकुमार्चन व सप्तशती पाठ, दुपारी 1 ते 3 वा.महाप्रसाद, 3 ते 7 वा. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ (चेंदवण, देवेंद्र नाईक प्रस्तुत)चे नाटक, रात्री 8 वा.पुराण- पालखीतून श्रींची मिरवणूक, रात्री 10 वा.कीर्तन – ह. भ. प. श्री. भाटवडेकर बुवा,
गुरुवार दि. 16 रोजी सकाळी 7 वा.महारुद्र समाप्ती, दुपारी 1 ते 3 वा.महाप्रसाद, दुपारी 3 ते 7 वा. दशावतारी नाट्यप्रयोग ( बाळा कलिंगण प्रस्तुत ), रात्री. 8 वा.,पुराण- पालखीतून श्रींची मिरवणूक, रात्री 10 वा. कीर्तन – ह. भ. प. श्री. भाटवडेकर बुवा, शुक्रवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वा.परिवार देवतांवर अभिषेक पूजन,दुपारी 1 वा.पासून वरदशंकर पूजा, 1 वा. पासून ते 3 वा. महाप्रसाद, दुपारी 3 ते 7 वा. श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरुर, कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत)चे नाटक, रात्री 8 वा.पुराण- पालखीतून श्रींची मिरवणूक, रात्री 10 वा. कीर्तन – ह. भ. प. श्री. भाटवडेकर बुवा, शनिवार दि. 18 रोजी महाशिवरात्री दिवशी सकाळी 5 वा. धार्मिक विधी व श्रींचे दर्शन, सायं. 4 वा. कीर्तन – हभप भाटवडेकर बुवा, रात्री 10 वा.पुराण- पालखीतून श्रींची मिरवणूक, रात्री 12 वा. दशावतारी गणपती दर्शन श्रींची वाजत गाजत रथापर्यंत आगमन, रात्री 12.30 वा. आकर्षक विद्युत रोषणाईसह श्रींची रथातून मिरवणूक, दशावतारी नाटकाचा उर्वरित भाग. यावेळी श्री देव कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर (कै. बाबी कलिंगण प्रस्तुत) यांचे नाटक सादर होणार आहे. रविवार दि. 19 फेब्रुवारी रोजी सायं. 5 वा. हभप श्री. भाटवडेकर बुवा यांचे किर्तन होणार आहे. या उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेरूरच्या वतीने करण्यात आले आहे.