आमदारांच्या श्रेय वादाच्या भोवऱ्यात, वरखेडी ते कुऱ्हाड रस्ता गेला खड्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड ते वरखेडी हा अंदाजे ४ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे पिंपळगाव हरेश्वर, भोजे, शिंदाड, चिंचपुरा, खावखेडा, वरसाडे, वरखेडी, लोहारी, लासुरे व अजुन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना जिल्हाचे ठिकाणी म्हणजे जळगाव जिल्हाचे जाण्यासाठी एकमेव कमी अंतराचा रस्ता आहे.
मात्र या रस्त्याची मागील दोन वर्षापासून चाळणी झाली असून यारस्त्यावरुन वाहन चालवणेच काय पण पायी चालणेही मुश्कील झाले असून दररोज अपघातांची मालिका सुरु असून आतापर्यंत तिन दुकाचीस्वारांना अपंगत्व आले तर काहींना दवाखान्यात एकलाख रुपये पर्यंत खर्च आला आहे. म्हणून पंचक्रोशीतील जनतेने वरखेडी ते कुऱ्हाड रस्त्याचे त्वरित नुतनीकरण व्हावा अशी मागणी लावून धरली होती.
ही जनतेची समस्या लक्षात घेत पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी रस्त्याच्या नुतनीकरण करण्यासाठी मा.ना.श्री. दादासाहेब भुसे (राज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिनांक २५ मे २०१९ रोजी पत्र देऊन या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी अंदाजित रक्कम (सत्तरलाख रुपये) निधीची मागणी केली होती.
तसेच याच कालावधीत जिल्हापरिषद सदस्या सौ. रेखाताई दिपकसिंग राजपूत यांनी दिनांक २३ मे २०१९ रोजी मा.ना.श्री.दादासाहेब भुसे यांना व रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे म्हणून दिनांक १४फेब्रुवारी २०२० रोजी मा.ना.श्री. गुलाबराव पाटील.(पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री) जळगाव जिल्हा यांना पत्र देऊन रस्त्याच्या कामासाठी मागणी केली होती.
ही मागणी लक्षात घेत वरखेडी ते कुऱ्हाड रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ६३,७६,८०४ रुपये मंजूर करून तसे पत्र पाठवले होते.व त्यानुसार पाचोरा तालुक्यातील एका ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते.
परंतु कुऱ्हाड हे गाव जामनेर विधानसभा मतदारसंघात तर वरखेडी हे पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात येत असल्याने या कामाच्या मंजूरी पासून तर कामाचा शुभारंभ करुन या कामाचे श्रेय आपपल्या पदरात पाडून घेण्यासाठी स्पर्धा सुरु झाली होती.
या श्रेय वादाच्या भोवऱ्यात या रस्ताचे काम अडकले व म्हणतात ना (दुष्काळात तेरावा महिना) या म्हणी प्रमाने कोरोनासारखे संकट आले. या संकटात या रस्त्यासाठी आलेला निधी परत शासनाच्या तिजोरीत परत गेल्याचे खात्रीपूर्वक समजले आहे.
वरील बाबी व पत्रव्यवहार लक्षात घेतल्यास या रस्त्यासठी कोणी काय केले आहे. हे सर्वसामान्य जनतेच्या लक्षात आलेले आहे. परंतु आता या रस्त्यावर खडी व डांबरीकरण शिल्लक राहिलेले नसल्याने गरजूंना खड्यातुन प्रवास करत अपघातांना सामोरे जात स्वयंचलित वाहनांची मोडतोड सहन करत दिवस काढावे लागत आहेत.
म्हणून आतातरी पाचोरा, भडगावचे कर्तव्यदक्ष आमदारांनी रस्त्याच्या नुतनीकरणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून येत्या काही दिवसात मा.ना.श्री. दादासाहेब भुसे हे जिल्हात येणार आहेत ही संधी साधून त्यांच्या हस्ते या रस्त्याचे कामाचा शुभारंभ करुन या रस्त्याची समस्या सोडवावी अशी मागणी जोर धरत आहे.