उद्या पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला जातिय सलोखा अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहीम.

दिपक मुलमुले.(पिंपळगाव हरेश्र्वर)
दिनांक~०६/०५/२०२२
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता समाजकारणापेक्षा वैयक्तिक वादावर जास्त भर दिला जात आहे. यामागील कारण म्हणजे राजकारणातील आपली प्रतिमा उंचावण्यासाठी राजकीय खेळीत एकमेकावर चिखलफेक करणे सुरू आहे. याचा परिणाम वेगळा होत असून समाजा, समाजामध्ये जातीय तणाव निर्माण होऊन आपसातील मतभेद वाढत आहेत. याचा परिणाम सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करणारा ठरत असल्याने हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून जळगाव जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव वाढून सर्वधर्मीय सलोखा व शांतता टिकून राहण्यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रविण जी मुंडे यांनी एक नवीन संकल्पना राबवण्याचे ठरवले असून या संकल्पनेनुसार सर्वधर्मीय बांधव, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांना बोलावून सर्वधर्मीय स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा संकल्प केला आहे.
या संकल्पपूर्तीसाठी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला उद्या दिनांक ०७ मे २०२२ शनिवार रोजी सकाळी ०८ वाजेपासून सायंकाळी ०६ वाजेपर्यंत जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. तरी पिंपळगाव हरेश्र्वर येथील व पोलीस स्टेशनचे हद्दीतील सर्व गावागावांतील सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, धार्मिक संस्थांचे व धार्मिक स्थळांचे विश्वस्त, पुजारी, मौलाना, रोटरी क्लब, जॉगिंग ग्रुप, सायकलिंग ग्रुप, शैक्षणिक संस्था, शिक्षक वृंद, विद्यार्थी वर्ग, धार्मिक संघटना, गावागावांतील शांतता कमेटीचे अध्यक्ष, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, वैद्यकीय संघटना, मेडीकल असोसिएशन, अंगणवाडी सेविका, मदतनीस, डॉक्टर, शासकीय कर्मचारी, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य, महिला संघटना, महिला बचतगट सर्व जातीधर्माचे महिला, पुरुष, तरुण मंडळी, सर्व व्यावसायीक दुकानदार, मुद्रण क्षेत्रातील तसेच सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील, सामाजिक सर्व बंधु, भगिनींना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सर्वधर्मीय स्वाक्षरी मोहीमेत सहभागी होऊन आपले शहर व परिसर सर्वधर्मसमभावतेने वागत असून आमच्यातील जातीय सलोखा कायमस्वरूपी टिकून आहे व टिकून राहील व आम्ही कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवू असा संदेश देण्यासाठी उपस्थित राहून एक चांगला संदेश द्यावा असे आवाहन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांनी केले आहे.
(तसेच या जातीय सलोखा स्वाक्षरी मोहिमेच्या निमित्ताने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.)