सत्यजित न्यूजची दखल घेत कुऱ्हाड खुर्द गावातील जाहिराती झाकल्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२४
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता आचार संहिता लागली आहे. तरीही पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे फिर एक बार, मोदी सरकार ही जाहीरात जैसे थे असल्याने कुऱ्हाड खुर्द गाव परिसरात हा चर्चेचा विषय ठरला होता. याबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी याची दखल घेऊन ही जाहिरात त्वरित झाकतील का ? असा प्रश्न उपस्थित करत आचार संहिता जाहीर झाल्यापासून आजपर्यंत संबंधित जबाबदार घटक झोपेत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली होती.
कारण नियमानुसार आचार संहिता जाहीर झाल्यापासून कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात किंवा भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही परवानगी न घेता लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची व अधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक असते तसेच मागील काळात काही राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रक किंवा भित्तिचित्रे लावलेली असल्यास ती त्वरित काढून घेणे, झाकणे किंवा पुसून टाकणे असा सक्त आदेश दिला आहे.
मात्र पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द या गावात “एक बार मोदी सरकार” हे घोषवाक्य आजही जसेच्या तसे दिसून येत होते याबाबत कुऱ्हाड खुर्द गावातील सुज्ञ नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत होती याची दखल घेऊन सत्यजित न्यूजच्या प्रतिनिधिंनी कुऱ्हाड खुर्द गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन छायाचित्रे घेतली व “आचार संहिता लागली तरीही कुऱ्हाड खुर्द गावात फिर एक बार मोदी सरकार” या शीर्षकाखाली आज रोजी वृत प्रसिध्दीस दिले होते.
आचार संहिता लागली तरीही “कुऱ्हाड खुर्द गावात फिर एक बार मोदी सरकार” या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच कुऱ्हाड खुर्द गावातील ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी मा. श्री. रमेश महाजन व कुऱ्हाड खुर्द सजेचे तलाठी मा. श्री. काळकर साहेब यांनी कुऱ्हाड खुर्द येथे येऊन काही तरुण नागरिकांची मदत घेत राजकीय जाहिराती झाकुन व पुसुन टाकल्या आहेत. यामुळे जनतेच्या मनातील संभ्रम दूर झाला असून कुऱ्हाड खुर्द येथील सुज्ञ नागरिक व ग्रामस्थांनी सत्यजित न्यूजने वृत्त प्रसारित करुन संबंधितांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करुन दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांचा खुलासा ~
कुऱ्हाड खुर्द येथे कार्यरत असलेले तलाठी मा. श्री. काळकर साहेब व ग्रामविकास अधिकारी मा. श्री. रमेश महाजन यांनी सत्यजित न्यूजच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला व सांगितले की आचार संहिता लागताच आम्ही ०३ मार्च रोजी कुऱ्हाड खुर्द गावातील सर्व राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे काढून घेत भिंतीवर रंगवण्यात आलेल्या जाहिराती झाकुन व पुसून टाकल्या होत्या परंतु काही लहान, लहान मुलांनी उत्सुकतेपोटी या झाकलेल्या जाहिराती व भिंतीवर असलेले भित्तीचित्रे पुन्हा उघडल्याने हा घोळ झाला होता असा खुलासा देत तीन तारखेला जाहिरात झाकतांनाचे जिओ टॅग छायाचित्र सत्यजित न्यूज कडे पाठवली आहेत.
मागील दोन तासात कुऱ्हाड खुर्द गावातील सर्व राजकीय पक्षांच्या जाहीराती झाकण्यात आल्या असून आता जनतेच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.