आचार संहिता लागली तरीही कुऱ्हाड खुर्द गावात फिर एक बार मोदी सरकर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२४
लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता आचार संहिता लागली आहे. तरीही पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे राजकीय पक्षाची जाहीर जैसे थे असल्याने कुऱ्हाड खुर्द गाव परिसरात हा चर्चेचा विषय ठरला असून याबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचारी याची दखल घेऊन ही जाहिरात त्वरित झाकतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आचार संहिता जाहीर झाल्यापासून आजपर्यंत संबंधित जबाबदार घटक झोपेत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
नियमानुसार आचार संहिता जाहीर झाल्यापासून कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात किंवा भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक असते व विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती रहात नाही. तसेच मागील काळात काही राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रक किंवा भित्तिचित्रे लावलेली असल्यास ती त्वरित काढून घेणे, झाकणे किंवा पुसून टाकणे असा सक्त आदेश दिला आहे.
मात्र पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द या गावात एक बार मोदी सरकार हे घोषवाक्य आजही जसेच्या तसे असून कुऱ्हाड खुर्द गावात शासनाचे कार्यरत असलेले जबाबदार अधिकारी व कर्मचारी अद्यापही झोपेत आहेत की काय असा प्रश्न सुज्ञ नागरिक व सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला असून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.