श्रीराम नवमीला अहिंसा दिवस घोषित करावा, श्री. सतीश जैन. कुसुंबा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२३

श्रीराम नवमी म्हणजे प्रभू श्री. रामचंद्र यांचा जन्मदिवस हा दिवस अहिंसा दिवस म्हणून घोषित करण्यात यावा व अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील श्री. सतीश वसंतीलाला जैन यांनी एका निवेदनाद्वारे आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत सतीश जैन यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की हिंदूस्थान ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीत भगवान श्रीरामचंद्र प्रभू जन्माला आल्यामुळे आपल्या हिंदूस्थान ची भूमी पवित्र असल्यावरही आपल्या हिंदू संस्कृतीत गाईला आईची उपमा दिलेली असतांनाच आपल्या या हिंदुस्थानातच (भारतातच) गोहत्या व गोवंशाची हत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. यामागील कारण जाणून घेतले काय तर म्हणे गोमांस निर्यात करुन यातून परदेशी चलन मिळते असे सांगितले जाते परंतु ही बाब अतिशय निंदनीय आहे. कारण ज्या गायीला आपल्या हिंदू धर्मात पूज्यनिय मानतो जिच्या उदरात ३३ कोटी देव आहेत असे म्हटले जाते तसेच भगवान श्री कृष्णांनी गोपालन केले, भगवान श्री. शंकरांचे वाहन नंदी आहे. अश्या या पूज्यनिय असलेल्या गाय, बछड्यांची व गोवंशाची हत्या करुन पैसा कमावणे हे कितपत योग्य आहे.

तसेच गोमांस निर्यातीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता आपण परकीय देशात गोमांस निर्यात करुन तेथून रासायनिक खते मागतो अशी माहिती समोर येत आहे. जर असे असेल तर गोमाता व पशुधनापासून आपल्या या रासायनिक खतांच्या कित्येक पटीने चांगले शेणखत, गोमुत्र मिळते तसेच गोमुत्र व गायी पासून मिळणारे अनेक फायदे शास्त्रज्ञांनी पुराव्यानिशी सिद्ध केले आहेत असे असल्यावरही यांची हत्या करुन रासायनिक खते आणण्यासाठीचा हट्ट धरायचा कशासाठी असा प्रश्न उपस्थित करुन दिवसेंदिवस वाढत चाललेले कत्तलखाने व मोठ्या प्रमाणात पशुधनाची वैद्य, अवैधरित्या होणारी हत्या याबाबत खेद व्यक्त करत हा प्रकार त्वरित थांबला पाहिजे असे मत व्यक्त करत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रजी यांच्या जन्मदिनी सखोल विचार करुन हा दिवस म्हणजे श्रीराम नवमीला अहिंसा दिवस म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

विशेष म्हणजे मा. श्री. सतीश जैन यांनी विविध धार्मिक दाखले देत हिंदुस्थान पारतंत्र्यात असतांनाही मांस विक्री होत नव्हती. औरंगजेबाने सुध्दा गोवध व पशुहत्या बंदी घातली होती. मोगलांनी मांस आयात बंद केल्याचे दाखले देत अहिंसा परमो धर्म, भूतदया जीवदया म्हणणाऱ्या अहिंसावादी महात्मा गांधींच्या देशात कि ज्यांनी फक्त आणि फक्त सत्य आणि अहिंसेच्या बळावर इंग्रजांना पळवून लावले. व आता स्वातंत्र्यात जगत आहोत तरीही देशहितासाठीचा मुद्दा पुढे करुन गोमांस निर्यात करुन येणाऱ्या पैशातून देश विकासाच्या गप्पा मारत असाल तर ही बाब नक्कीच लाजीरवाणी बाब असून एका बाजूला विश्वशांतीच्या गप्पा करणाऱ्या या आपल्या देशात दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मांस निर्याती केली जात आहे. ही खेदाची बाब आहे. तसेच सत्ताधारी नवनवीन कत्तलखान्यांना परवानगी देण्यात व्यस असल्याने आपल्या कृषीप्रधान देशात भविष्यात गोधन मिळणे दुरापास्त होणार असून एकेकाळी दुधाची गंगा वाहणाऱ्या या देशाला वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.

म्हणून आजच्या सत्ताधारी सरकारने संपूर्ण कत्तलखान्यांना बंद करुन गोवंशाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. व त्यासाठी श्रीराम प्रभुंचा जन्मदिवस म्हणजे श्रीराम नवमी हा दिवस अहिंसा दिवस म्हणून घोषित करुन अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील मा. श्री. सतीश जैन. यांनी निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

ब्रेकिंग बातम्या