Monthly Archives: March 2024
-
आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाळधी शिवारातील गावठी हातभट्टी उध्वस्त.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०३/२०२४ आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा अधीक्षक मा. श्री. रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील पोलीसांनी आपली मरगळ झटकून अवैध धंद्याच्या विरोधात जोरदारपणे वॉश आऊट मोहीम हाती घेतली आहे. अशीच धडक कारवाई आज दिनांक २५ मार्च २०२४ सोमवार रोजी पाहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ... -
वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा .
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०३/२०२४ मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी बाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जळगाव व पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये येऊन चौकशी केली असता त्याठिकाणी ... -
पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी केली वॉश आऊट मोहीम सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०३/२०२४ पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत माहिती जाणून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक २४ मार्च २०२४ रविवार रोजी धाडसत्र राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावाजवळील निमखेडी रस्त्यालगत असलेल्या नाल्यात तसेच पिंप्री धरणाजवळील झाडाझुडुपांमध्ये गावठी दारु ... -
मुंबईच्या बाबूचा वरखेडी परिसरात थरार, रेशनिंगच्या तांदळाचा दिवसाढवळ्या काळाबाजार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०३/२०२४ वरखेडी येथून जवळच असलेल्या सावखेडा रस्त्यावर एक राईस मिल असून या मिलमध्ये मागील काही वर्षांपासून रेशनिंगच्या तांदूळाची मोठ्या प्रमाणात अवैध खरेदी केली जात असल्याचे जनमानसातून ऐकावयास येत आहे. याबाबत सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवला आहे. मात्र या राईस मिलचा मालक हा मुंबईचा असल्याने तसेच याच मिल मालकाला यावल व चोपडा येथून ... -
रविंद्र राठोड यांची बंजारा सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२३/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील गाळण (विष्णू नग) येथील रवींद्र वसंत राठोड यांची राष्ट्रीय बंजारा टायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. आत्माराम सुरसिंग जाधव यांनी बंजारा समाजासाठी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय बंजारा टायगर या सामाजिक संघटनेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड केली आहे. मला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याबद्दल मी संघटनेचा व समाजाचा सदैव ऋणी आहे. ... -
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात रेशनिंगच्या तांदूळाची खरेदी करुन काळ्या बाजारात विक्री.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१/०३/२०२४ पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विकला जातोय हा तांदूळ घेण्यासाठी पहुर, शेंदुर्णी, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, भडगाव व इतर लहानमोठ्या खेड्यापाड्यात व्यापारी तयार झाले आहेत. हे किरकोळ व्यापारी गल्लीबोळात फिरुन पंधरा ते वीस रुपये किलो दराने तांदूळ विकत घेऊन तो तांदूळ वरखेडी येथील राईस मिलमध्ये बिनधास्तपणे विकत ... -
पाचोरा तालुक्यातील रेशनिंगच्या तांदळाची एका खाजगी गोदामात साठवणूक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०३/२०२४ पाचोरा तालुक्यासह भडगाव, जामनेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात जात असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच रेशनिंगच्या तांदूळाची खुल्या बाजारात खरेदी, विक्री होत असल्याची तक्रार पाचोरा तालुक्यातील भोजे येथील समाजसेवक मा. श्री. निलेश उभाळे यांनी मा. तहसीलदार पाचोरा यांच्याकडे केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात गोरगरिबांसाठी येणारे ... -
पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. असे असले तरीही ही माहिती व अंदाज गेल्या काही दिवसांपासून जनतेपासून लपवून ठेवण्यात आली आहे. कारण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सगळेच डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याने हा दुध भेसळीचा गोरखधंदा दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु ... -
कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा पंटर अँटी करप्शन च्या जाळ्यात संशयाची सुई ग्रामसेवकाकडे.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२३ सद्यस्थितीत सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठला असून हे लोन आता गल्लीबोळात पर्यंत येऊन ठेपले आहे. असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील तांड्यावर घडला असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना मिळवून देण्यासाठी खाजगी परंतु कायमस्वरूपी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवकांच्या सोबत राहणाऱ्या एक खाजगी पंटरला आज दुपारी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेतांना रंगेहाथ ... -
पाचोरा तालुक्यातील संशयित राईस मिल व स्वस्त धान्य दुकानदारांच्या चौकशीसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०३/२०२४ पाचोरा, भडगाव ताल्युक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शासनमान्य स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे तसेच पुरवठा व वितरण विभागाच्या छुप्या आर्शिर्वादाने गोरगरिबांना अल्पदरात व मोफत धान्य वाटप योजनेत मोठा गोंधळ सुरु असून हे गोरगरिबांसाठी येणारे धान्य काळाबाजार जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी काही सुज्ञ नागरिक लवकरच अन्न, नागरी पुरवठा ...