पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात रेशनिंगच्या तांदूळाची खरेदी करुन काळ्या बाजारात विक्री.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२४
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात रेशनिंगचा तांदूळ मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विकला जातोय हा तांदूळ घेण्यासाठी पहुर, शेंदुर्णी, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, भडगाव व इतर लहानमोठ्या खेड्यापाड्यात व्यापारी तयार झाले आहेत. हे किरकोळ व्यापारी गल्लीबोळात फिरुन पंधरा ते वीस रुपये किलो दराने तांदूळ विकत घेऊन तो तांदूळ वरखेडी येथील राईस मिलमध्ये बिनधास्तपणे विकत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तसेच आज रोजी अंबे वडगाव तांड्यावर एक व्यापारी रेशनिंगचा तांदूळ विकत घेण्यासाठी आला असता काही सुज्ञ नागरिकांनी या व्यापाऱ्याची गाडी अडवून घेत पाचोरा येथील पुरवठा अधिकाऱ्यांना कळवले होते. पुरवठा अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत संबंधित व्यापारी दांडगाई करुन गाडी घेऊन पळुन जाण्यात यशस्वी झाल्यामुळे पुढील कारवाई करण्यात आली नाही.
सुचना ~ व्हिडिओ डाऊनलोड करुन याच वापर करु नये ही नम्र विनंती.