कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचा पंटर अँटी करप्शन च्या जाळ्यात संशयाची सुई ग्रामसेवकाकडे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे भ्रष्टाचाराने कळस गाठला असून हे लोन आता गल्लीबोळात पर्यंत येऊन ठेपले आहे. असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील तांड्यावर घडला असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना मिळवून देण्यासाठी खाजगी परंतु कायमस्वरूपी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवकांच्या सोबत राहणाऱ्या एक खाजगी पंटरला आज दुपारी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेतांना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता आज दिनांक १९ मार्च २०२४ मंगळवार रोजी दुपारी कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामपंचायत भोवती सतत फिरणारा व ग्रामसेवकासोबत राहून ग्रामपंचायतीच्या कामकाजात ढवळाढवळ करणाऱ्या एका व्यक्तीला जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाने एका इसमांकडून पैसे घेताना रंगेहात पकडले असल्याची घटना घडली आहे.
या खाजगी इसमा बाबत अधिक माहिती जाणून घेतली असता सदरचा इसमा हा कायम ग्रामपंचायत मध्ये राहून गावातील लोकांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन जागा नावे लावणे, उताऱ्यावर नावे लावणे, फेरफार नोंदी करणे, शासनाकडून देण्यात येणाऱ्या घरकुल, वैयक्तिक शौचालय व इतर योजना मिळवून देण्यासाठी पैसे घेऊन काम करत होता.
विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक या व्यक्तीला हाताशी धरून काम करुन घेत होते अशी माहिती कुऱ्हाड बुद्रुक तांड्यावर राहणाऱ्या एका इसमाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. व यातच हा पैसे घेण्याचा प्रकार घडल्याने या प्रकरणात संबंधित ग्रामसेवकाकडे संशयाने पाहिले जात असून संबंधित पैसे घेणारा संशयित व कुऱ्हाड बुद्रुक ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक याचा भ्रमणध्वनी तपशील काढून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कडक कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. कारण या पंटरने आजपर्यंत अशाच प्रकारे लाखो रुपये कमवले असल्याचे कुऱ्हाड बुद्रुक गाव व तांड्यावर चर्चा ऐकायला येत आहे.
सविस्तर वृत्त प्रेस नोट मिळाल्यावर