Monthly Archives: March 2024
-
वक्रतुंड सॉ मिल वर वनविभागाचा वरदहस्त, लाकुड वाहतूक केली जाते बिनधास्त.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०३/२०२४ सद्यस्थितीत पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज विनापरवानगी मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन चिंचपूरा येथील समाजसेवक व निसर्गप्रेमी मा. श्री. निलेश उभाळे यांनी वृक्षतोड थांबवून अनाधिकृतपणे लाकुड खरेदी करुन त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सॉ मिल वर कारवाईची मागणी केली होती ... -
लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत लोहारीच्या सरपंचांनी केली थेट शिक्षण सचिवांकडे तक्रार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाचे नवनवीन कारनामे समोर येत असून यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने लोहारी गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून लोहारी गावच्या सरपंच सौ. रंजनाताई प्रविण पाटील यांनी मा. शिक्षण सचिव शिक्षण विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ... -
वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी बाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जळगाव व पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये येऊन चौकशी केली असता त्याठिकाणी ... -
वडगाव जोगे येथील पाणीपुरवठा विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारा विरोधात चक्क सरपंचांची तक्रार
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायत असून या मध्ये वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे गावाचा समावेश आहे. आता नुकतेच वडगाव जोगे गावासाठी जल जिवन मिशन अंतर्गत नवीन विहीर व पाईप लाईन मंजूर झाली आहे. तसेच या पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. मात्र हे काम करतांना संबंधित ... -
पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०३/२०२४ पाचोरा हे तालुक्याचे मोठ्या लोकसंख्येचे शहर असून पाचोरा पोलीस स्टेशनला मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक नसल्याने शहराचाच नव्हे तर जवळपास ८५ गाव, खेड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाचोरा हे तालुक्याचे ठिकाण असून या शहराची सह जवळपास ८५ खेड्यापाड्यातील कायदा सुव्यवस्था व सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पाचोरा पोलीस स्टेशनला अद्यापही पोलीस ... -
चिंचपूरा येथील गायराण जमीनीवर लावलेल्या बांबूची विक्री केल्यास, आंदोलन छेडण्याचा निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांचा इशारा .
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील चिंचपूरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मनमानी कारभार सुरू केला असून गरज नसतांना चिंचपूरा गावाच्या पन्नास एकर गायराण जमीनीवर लावलेले बांबू विकण्याचा ग्रामसभेत एकतर्फी निर्णय घेतला आहे. या निर्णयाला गावातील निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी त्याच ग्रामसभेत या बांबूच्या विक्रीसाठी विविध दर्शवत जवळपास शंभराहून अधिक सह्यांचे निवेदन देऊन बांबूचे बन विक्री करु नये अशी ... -
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळ सक्रिय, मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०३/२०२४ ******************************** ब्रेकिंग ~ विशेष म्हणजे चिंचपुरा येथील नवतरुण कायदेतज्ञ मा. श्री. निलेश उभाळे यांनी अवैध वृक्षतोड व अवैध सॉ मिल बाबत वरीष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना भोजे येथे येऊन संबंधित सॉ मिलची सखोल चौकशी करावी लागते यावरुनच पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा नाकर्तेपणाचा बुरखा फाटला ... -
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथे, विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०३/२०२४ पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ०१ मार्च २०२४ शुक्रवार रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित एकुण ३८८ प्रकल्प बनवून इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतून माहिती सादर केली. बनवलेले प्रकल्प व विद्यार्थीनी दिलेली माहिती ...