पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२४
पिशवीतील भेसळयुक्त दुधामुळे सन २०२५ पर्यंत ८७ टक्के भारतीय कॅन्सर ग्रस्त होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. असे असले तरीही ही माहिती व अंदाज गेल्या काही दिवसांपासून जनतेपासून लपवून ठेवण्यात आली आहे. कारण दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सगळेच डोळ्यावर पट्टी बांधून बसले असल्याने हा दुध भेसळीचा गोरखधंदा दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरु आहे. यामागील कारण म्हणजे दुधात भेसळ करणाऱ्यांना राजकीय पाठबळ दिले जाते तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सर्वच नाही काही अधिकारी व कर्मचारी या भेसळयुक्त दूध गंगेत आपले हात धुऊन घेत आहेत तर जे जबाबदार अधिकारी व कर्मचारी इमानेइतबारे काम करु इच्छीतात त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणला जातो असे खात्रीलायक वृत्त आहे.
आतापर्यंत जे कॅन्सरग्रस्तांचे प्रमाण वाढले आहे याला कारणीभूत भेसळयुक्त दूध हेच मुख्य कारण असल्याचे बोलले जात सांगितले जात असून हा दूध भेसळीचा गोरखधंदा असाच सुरु राहिल्यास भविष्यात म्हणजे “सन २०२५ पर्यंत भारतात ८७ टक्के लोक कॅन्सरग्रस्त होतील” असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. याचाच सरळ अर्थ असा की पिशवीतून मिळणारे दूध हे आरोग्यासाठी घातकच आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण रोज जे दूध खातो, पितो ते स्लो पॉयझन तर नाही ना याची खात्री करुन घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
हा भेसळीचा प्रकार फक्त दुधातच केला जात नसून अनेक खाद्यपदार्थांमध्ये विविध रासायनिक व घातक असे केमिकल वापरले जात असल्याचे दिसून येत असले तरीही आपल्यात जागरुतेचा आभाव दिसून येत असून जागो ग्राहक जागो चा नारा खुपच शांत झाला असल्याने दुध व दुग्धजन्य पदार्थ घेतांना व खातांना पारखून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत आपण आळशी व खादाड बनत चाललो आहे असा अनुभव येत आहे कारण आपण जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगतो आहोत थोडक्यात जीभेचे चोचले पुरवण्यासाठी खात असल्याने “जीभेचे लाड पुरवण्या आधी आरोग्याच्या विचार करा” या ब्रीद वाक्याचा आपल्याला नक्कीच विसर पडला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.
आपण जेव्हा अशिक्षित होतो तेव्हा वाचता, लिहिता येत नव्हते तरीही समजदारीने वागत, जगत होतो पण आता आपण चार पुस्तके शिकलो, सवरलो तरीही आपण या भेसळयुक्त दुधाचा आपल्या आहारात सर्रासपणे वापर करुन कॅन्सर सारख्या आजाराला निमंत्रण देत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण पिशवीतून विकल्या जाणाऱ्या दुधात युरिया, वॉशिंग पावडर दुध लवकर खराब होऊ नये म्हणून मृतदेह कुजू नये यासाठी वापरली जाणारी रासायनिक पावडर वापरली जाते व आरोग्याच्या दृष्टिने अत्यंत घातक आहे.
परंतु कमीत, कमी वेळात व कमी श्रमात जास्तीत जास्त पैसा कमावण्यासाठी आज दुध व्यवसायीकाने कहरच केला असल्याचे दिसून येते. ह्या सर्व गोष्टी माहीत असतांनाही आपण दुध डेअरी व पिशवीतून दुध विकणाऱ्या कंपन्यांवर विश्वास नव्हे तर अंधविश्वास ठेवत बिनधास्तपणे भेसळयुक्त दुध खरेदी करुन त्यावर ताव मारतो व आपल्या व आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहोत. म्हणून आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी हे केमिकल युक्त दुध न घेता गायी, म्हशींचे शुध्द दुध खरेदी करुन थोडेच खा, पण चांगले व शुद्ध खा म्हणजे आपण व आपली पिढी कॅन्सर सारख्या आजाराला बळी पडणार नाही.