दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२३

जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप हे रुजू झाल्यापासून त्यांनी लगेचच अवैध धंदे करणारांची कुंडली काढून सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व अवैध विक्री करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवून अवैध धंदे करणारांचे कंबरडे मोडण्यासाठी सतत कार्यरत आहेत.

आता नुकतेच पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे चिलगाव येथील रहिवासी इसम सुपडू बंडू तडवी वय वर्षे (४२) हा मागील कित्येक वर्षांपासून गावठी हातभट्टीच्या दारुचे बेकायदेशीर उत्पादन करुन विक्री करत होता. या अवैध दारु निर्मिती व विक्री बाबत मागील काही वर्षांपासून पहुर पोलीसांनी त्याच्यावर वेळोवेळी धाडसत्र राबवून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ९३ अन्वये आत्तापर्यंत २० गुन्हे दाखल केले आहेत. सतत कारवाया करुनही संबंधित सुपडू बंडू तडवी हा कायद्याला जुमानत नसल्याने पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांनी पाठपुरावा करुन दिनांक ०५ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी संबंधितावर एम. पी. डी. ए. अंतर्गत कारवाई करणे गरजेचे असल्याचे लक्षात आणून देत तसा प्रस्ताव दाखल केला होता.

यावरुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. एम. राजकुमार साहेब यांनी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे एम. पी. डी. एक. अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असता या प्रस्तावाची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी यांनी संबंधित आरोपी विरोधात स्थानबध्देतेच्या कारवाईचा आदेश पारित केला प्रस्थाव पारित होताच संबंधित आरोपी सुपडू बंडू तडवी याला ताब्यात घेत अमरावती येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जे भागचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. किसनराव नजन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप साहेब, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. संजय बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील, हेडकॉन्स्टेबल विरणारे, पोलीस कॉन्स्टेबल जिजाबराव कोकणे, ज्ञानेश्वर ठाकरे, विजयकुमार पाटील यांनी पार पाडली.

या कारवाईबाबत जळगाव व पहुर पोलीसांचे आभार मानले असून पंचक्रोशीतील सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त करत अशा कारवाया होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.