दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२३

सद्यस्थितीत ऑनलाईन वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे ग्राहकांना वेळेवर हवी ती वस्तू बाजार किंमतीपेक्षा वाजवी दरात घरबसल्या उपलब्ध होत असल्याने वस्तू खरेदीसाठी जाण्यायेण्याचा खर्च व वेळ वाचत असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील लोकही मीशो या कंपनीच्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून विविध वस्तू खरेदी करतांना दिसून येत आहेत.

संबंधित ग्राहकाने त्याला हवी ती वस्तू ऑनलाईन पद्धतीने आर्डर केल्यानंतर एका आठवड्याचा आत ती वस्तू डिलीव्हरी बॉयच्या माध्यमातून संबंधित ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. ग्राहकाने वस्तूंची ऑर्डर दिल्यानंतर त्या वस्तूचे कधी वितरण होणार आहे याचा एक किंवा दोन दिवस अगोदर संदेश प्राप्त होतो. मात्र कधीकधी नेटवर्क प्रॉब्लेम असल्याकारणाने ग्राहकांना संदेश प्राप्त होत नाही. अश्यावेळी एखादा डिलीव्हरी बॉय हा अचानकपणे ग्राहकांच्या दरवाज्यात येऊन उभा रहातो तेव्हा संबंधित ग्राहक हा एखाद्यावेळी पैशाची जुळवाजुळव करत असतांनाच वस्तू घेऊन आलेला डिलीव्हरी बॉय हा ग्राहकांशी हुज्जत घालत असल्याच्या घटना घडत आहेत.

आज दिनांक २७ डिसेंबर २०२३ बुधवार रोजी अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात घडली असून फोटोतील डिलीव्हरी बॉय हा एका ग्राहकाच्या घरी यमदूता सारखा येऊन धडकला असता संबंधित ग्राहकाकडे पाहूणे बसले असतांनाच त्या ग्राहकाने डिलिव्हरी बॉयलआ आदरपूर्वक घरात बोलावून पाणी दिले व थोड थांब असे सांगितले असता संबंधित डिलीव्हरी बॉयंने काहीएक ऐकून न घेताच अरेरावीची भाषा वापरुन संबंधित ग्राहकाशी जोरदार हुज्जत घातली व ऑर्डर केलीली वस्तू न देताच निघून गेल्याची घटना घडली असून संबंधित डिलीव्हरी बॉयने ग्राहकाशी घातलेल्या हुज्जतीचे संपूर्ण सी. सी. टी. व्ही. फुटेज सत्यजित न्यूजच्या हाती लागले आहेत.

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता संबंधित डिलीव्हरी बॉयने आम्ही चांगल्या, चांगल्यांच्या घरी पाय ठेवत नाही. आम्हाला तुमची गरज नाही. अशा शब्दात शाब्दिक चकमक करुन अरेरावीची भाषा वापरुन संबंधित ग्राहकाशी जोरदार वाद घातला असल्याचे सी. सी. टी. व्ही. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते आहे. या प्रकारामुळे मीशो कंपनीची प्रतिमा मलीन होत असून “ग्राहक ही देवता है” असे म्हणणाऱ्या मीशो ऑनलाईन कंपनीबद्दल जनतेच्या व ग्राहकांच्या मनात वेगळीच भावना निर्माण होत असल्याने कंपनीकडून अश्या डिलीव्हरी बॉयची हकालपट्टी करुन होतकरु डिलीव्हरी बॉयची नेमणूक करावी अशी मागणी केली जात आहे.

तसेच संबंधित ग्राहक त्या भांडखोर डिलीव्हरी बॉयच्या विरोधात लवकर रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.