दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२३

आज दिनांक २९ डिसेंबर २०२३ शुक्रवार रोजी पाचोरा येथे रेल्वे सल्लागार समितीची १७१ वी बैठक रेल्वे प्रशासनाचे डी. एम. आर. पांडेजी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप पाटील यांनी रेल्वे बाबतीत येणाऱ्या तसेच प्रवाशांच्या विविध समस्या लक्षात आणून देत त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करता येतील याबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच महत्वाचे म्हणजे पाचोरा जंक्शनच्या सौंदर्यात भर पडावी व रेल्वेचा इतिहास जीवंत रहावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ब्रिटिशकालीन पी. जे. रेल्वे म्हणजे पाचोरा ते जामनेर या इतिहासकालीन रेल्वेचे इंजिन पाचोरा जंक्शनच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावे तसेच पाचोरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस काळजी घेण्यासाठी झटणारे आर. पी. एफ. पोलीस सुरवाडे यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांना पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती केली होती मागणीला व विनंतीला समितीच्या सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली लगेचच रेल्वे प्रशासनाचे डी. एम. आर. पांडेजी मॅडम यांनी दिलीप पाटील यांच्या मागणीनुसार लगेचच निर्णय घेऊन मंजूर देत तश्या आशयाच्या मंजूरी पत्रावर शिक्कामोर्तब करुन तसे पत्र त्वरित दिलीप पाटील यांच्या स्वाधीन केले. तसेच पोलीस सुरवाडे यांना तात्काळ पुरस्कार देण्यात येईल असे जाहीर केले.

तदनंतर पाचोरा शहर हे मोठ्या बाजारपेठेचे तालुकास्तरावरील शहर असून येथून मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्ग व्यवसायानिमित्त मोठ्या शहरांकडे जात असतो तसेच पाचोरा, भडगाव, जामनेर येथील मुंबई, दिल्ली, नागपूर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने पाचोरा रेल्वे स्टेशनवर कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत याबाबत सविस्तर माहिती देत महाराष्ट्र एक्सप्रेस व पॅसेंजर मेमु ट्रेन पुर्ववत करण्यासाठी दिलीप पाटील यांनी विनंती केली. सर्व समस्या एकुण घेत सर्व समस्या ह्या प्रवाशांच्या हितासाठी असून या सुविधा उपलब्ध करुन दिल्यातर नक्कीच रेल्वेच्या प्रवाशांसाठी सोयीचे होईल व प्रवाशांची संख्या वाढत जाऊन रेल्वेला फायदाच होणार असल्याचे सांगत सर्व समस्या लवकरच सोडविण्यासाठी भुसावळ मंडळातर्फे प्रयत्न करु असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत रोहित फडणीस व सर्वच सदस्य, उपस्थित होते. रेल्वे सल्लागार समिती सदस्य दिलीप पाटील यांना लेखी उत्तरे देऊन उत्साहपूर्ण वातावरणात सदर बैठक पार पडली.