पिंपळगाव हरेश्वर येथील २० वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणी, सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील एका दलित कुटुंबातील २० वर्षीय तरुणीवर एका महिलेच्या मदतीने जिवे मारुन टाकण्याची धमकी देत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडून आरोपी गोपाल पाटील याच्या शेतातील पत्री शेडमध्ये तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला यातून ती गरोदर राहून तिने एका मुलीला जन्म दिला आहे.
याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिनांक २५ फेब्रुवारी गुरुवाररोजी सायंकाळी सहावाजेचे सुमारास पिडीत तरुणीने स्वता हजर होऊन फिर्याद दिल्याने याप्रकरणी आरोपींना मदत करणारी आरोपी महिला समीनाबाई लुकमान तडवी व वारंवार अत्याचार करणारे निंबा सावळे, निलेश, शिवाजी, गोपाल पाटील, बापू उर्फ संजु आढाव सर्व पिंपळगाव हरेश्वर यांच्या विरोधात तक्रार दिली. गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२१ भा.द.वी.कलम ३७६, ३७६ड,३७६(२), (एन) ५०४, ५०६, ३४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आला असुन
पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. प्रविणजी मुंढे साहेब यांच्या मार्गदर्शनखाली डी.वाय.एस.पी. श्री. भारत काकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. निताजी कायटे व टीम मधील पो.हे.कॉ. श्री.रणजित पाटील पो.ना.श्री.अरुण राजपूत पो. का.श्री. संदीप राजपूत पो.ना.रविंद्रपाटील पो.का. संभाजी सरोदे हे करीत आहेत.