चोरीच्या १० दुचाकींसह दोन संशयितांना अटक; पिंपळगाव (हरे) पोलीसात गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२१
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यापार्श्वभूमीवर तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक करुन दोघांकडून चोरीच्या १० मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
या बाबत सविस्तर असे की पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार आपल्या सहकार्यांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यावर मिळालेल्या माहिती नुसार सपोनि निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी गणेश बाबुलाल परदेशी (वय-४२) आणि अंकुश भिमराव मरसाडे (वय-२३) दोन्ही रा. जंगिपूरा ता. जामनेर दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. दोघांना खाक्या दाखविताच त्यांनी दहा चोरीच्या दुचाकींची चोरी केल्याचे कबुल केले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या आदेशान्वये प्रभारी अधिकारी सपोनि निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ निवृत्ती मोरे, रणजीत पाटील, पो.ना. अरूण राजपूत, रविंद्रसिंग पाटील, संदीप राजपूत, चालक पो.ना. सचिन वाघ यांनी अथक परिश्रम घेतले.