घोगरगावात देशी व गावठी दारुचा पुर, कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०५/२०२३
अहमदनगर जिल्ह्या नेवासा तालुक्यातील घोगरगावात सद्यस्थितीत देशी व गावठी दारुचा पुर आला असून या घोगरगावात सकाळपासूनच देशी व गावठी दारुची खुलेआमपणे दिवसरात्र अवैध विक्री सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोगरगावात मागील सहा महिन्यांपासून भरवस्तीत, रहदारीच्या रस्त्यावर, धार्मिक स्थळे तसेच शाळा परिसरात दिवसाढवळ्या देशी व गावठी दारु बिनधास्तपणे विकली जात आहे. गावातच मुबलक प्रमाणात दारु उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलांसह लहानमोठे, जेष्ठ नागरिक दारुच्या व्यसनाच्या आहारी जाऊन दिवसेंदिवस व्यसनाधीनता वाढत आहे.
यामुळे दारुडे लोक गावात गोंधळ घालत फिरतांना दिसून येतात तसेच दारु अंगात आल्यानंतर ते कारण नसतांना कुणाशीही भांडण करत असल्याने गावातील शांतता भंग झाली असून हे दारुडे व्यसनपूर्ती करण्यासाठी घरातील धान्य तसेच संसारपयोगी वस्तू विकून दारु पित असल्याने घराघरात उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून नेवासा पोलिसांनी तसेच दारुबंदी विभाग (राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी) यांनी धाडसत्र राबवून घोगरगावात सुरु असलेली अवैध दारु विक्री त्वरित थांबवावी अशी मागणी घोगरगाव येथील महिलांनी तसेच सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
ऐकाव ते नवलच ~
घोगरगावात अवैध धंदे करणारांची हिंमत वाढली असून दारु बंदी करण्यासाठी कुणीही पुढे आल्यावर ते त्यांना दमदाटी करुन आम्ही पोलीसांना हप्ते देतो असे खोटेच सांगुन जनसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करतात म्हणून नेवासा पोलिसांनी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.