पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या वॉश आऊट मोहीमेत, पिंप्री (शिंदाड) येथील दारु अड्डा उध्वस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०७/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपळगाव हरेश्वर पासून ढजवळच असलेल्या शिंदाड शिवारातील गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर आपल्या सहकाऱ्यांसह थेट धाड टाकून जवळपास दिडलाख रुपये किंमतीचे रसायन नष्ट केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. रणजीत पाटील, मा.श्री.पोलिस नाईक मा.श्री. रवी पाटील, पोलिस नाईक मा.श्री. अरुण पाटील,पो.नाईक मा.श्री. सचिन वाघ व होमगार्ड यांना सोबत घेऊन शिंदाड येथून जवळच असलेल्या पिंप्री धरणाच्या भिंतीजवळील जॉकवेल जवळ सुरु असलेल्या गावठी दारु निर्मिती अड्ड्यावर धाड टाकून ५० लिटरच्या ४ प्लॅस्टिक ड्रम मधील २०० लिटर गुळ, नवसागर मिश्रीत कच्चे रसायन नष्ट केले. तसेच २०० लिटर प्लॅस्टिक टाकीतील १८० लिटर १००००/०० किंमतीचे कच्चे रसायन व १०००/०० रुपये किंमतीचे पक्के उकळते रसायन व १०००/०० रुपये किंमतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारु असे ८२१०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करुन पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. रणजीत पाटील पंचनामा केला असून पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील पुढील तपास करित आहेत.
या कारवाई दरम्यान आरोपी शौकत सिकंदर सिकंदर तडवी हा फरार झाला असून याचे विरोधात पोलिस नाईक संदीप बजरंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून दारुबंदी अधिनियम ६५ फ,ब,क,ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या धडक कारवाई बद्दल पंचक्रोशीतील जनतेतून समाधान व्यक्त केले जात असून अशीच कारवाई करुन शिंदाड गावपरिसरातील गावठी व देशी दारु कायमस्वरूपी हद्दपार करावी अशी मागणी होत आहे.