आंबे वडगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०४/२०
पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथील रायबा तानाजी हटकर वय ३९ या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवार दिनांक ०५ एप्रिल सोमवार रोजी सकाळी लक्षात आला असून पोलिस स्टेशनला खबर दिल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.कुलकर्णी यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मयत रायबा हटकर यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. रायबा हटकर यांना एक मुलगी व दोन मुले असून मुलीचे लग्न झाले असल्याने ती सासरवाडीत आहे. मात्र दोन लहान मुले यांच्या सोबत संसाराचा गाडा ओढतांना घरात स्वयंपाक, धुणीभांडी करुन घर सांभाळणे रायबा यास कठीण होऊ लागले होते.
त्यातल्या त्यात फक्त अडीच एकर कोरडवाहू शेतजमीन निसर्गाचा लहरीपणा यामुळे संसाराचा गाडा ओढणे मुश्कील झाले असल्याने त्यातच डोक्यावर असलेल्या कर्जासह जिवन जगतांना मेटाकुटीला आल्यामुळे रायबा याने नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचे समजते.
कष्टाळू व प्रेमळ स्वभावाच्या रायबाने आत्महत्या केल्याचे वृत्त माहीत पडताच पंचक्रोशीतील जनतेतून हळहळ व्यक्त केले जात आहे.