ज्या कोरोना बाधितांना केले आहे होम कॉरंटाईन, ते गल्लीबोळात फिरुन सांगतात आय एम फाईन. (सरपंच व पोलीस पाटील लक्ष देतील का ?)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०३/२०२१
सर्वदूर कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून आता महाराष्ट्र जिल्हा, तालुकाच नव्हेतर आता खेडे गावापर्यंत गल्लीबोळात कोरना येऊन ठेपलाय.
शासन-प्रशासन आरोग्य विभागातर्फे व इतर आरोग्य सेवक यांची मदत घेऊन गावा गावात घरोघरी जाऊन आरोग्य तपासनी करुन कोरोना बाधितांचा शोध घेतला जात आहे. यात कोरोना बाधितांचा शोध घेऊन पुढील उपचारासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
तसेच लसीकरण त्वरित करून घ्यावे यासाठी जनजागृती करत आहेत. परंतु दुसरीकडे कोरना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच आता काही कोरोना बाधित दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी नाकात आहेत. तसेच कोरोना सेंटरला रुग्णांना ठेवण्यासाठी अडचणी असल्याने बऱ्याच खेडेगावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यावर त्यांना होम कॉरंटाईन करण्यात येत आहे.
होम कॉरंटाईन करतांना आरोग्य विभागातर्फे कोरोना बाधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांना सर्व माहिती देत सोशल डिस्टन्सींगचा फायदा समजावून सांगितला जात आहे. यात घरातील व्यक्ती व गावातील व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये म्हणून सामाजिक अंतर राखून कोरोना बाधितांना आहार व औषधी देण्यासाठी सांगितले आहे.
तरीही खेड्यापाड्यातील होम कॉरंटाईन केलेले काही रुग्ण (मला केले आहे होम कॉरंटाईन बट आय एम फाईन) असे सांगत गल्लीबोळातून फिरुन ठिकठिकाणी टप्पे ठोकून आपल्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर कायकाय घडले हे मोठ्या कौतुकाने सांगत लोकांच्या सहवासात फिरत असल्याचे गावपरिसरात दिसून येत आहे. व तश्या तक्रारी सुज्ञनागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या कारणास्तव खेडेगावातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननिय प्रांताधिकारी साहेब, माननीय तहसीलदार साहेब तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यांनी वारंवार सुचना देऊनही सरपंच ग्रामसेवक व पोलीस पाटील आपपली जबाबदारी पर पाडतांना दिसून येत नसल्याचे चित्र आहे.
म्हणून गावागावातील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका तसेच सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व पोलीस पाटील. यांना सांगून होम कॉरंटाईन केलेल्या कोरना बाधित रुग्णांची जबाबदारी देऊन ज्या घर परिसरात कोरोनाबाधित रुग्ण होम कॉरंटाईन करण्यात आलेला असेल त्या रुग्णांची गावातील भटकंती थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत व संबंधित ऐकायला तयार नसेल तर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सुचना द्याव्यात. अन्यथा पुढील काळात कोरोनाचे संकट गडद होण्यास उशीर लागणार नाही. असे मत जनमासातून व्यक्त केले जात आहे.