आंबे वडगाव येथील अवैधधंदे बद न झाल्यास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण
मागील दोन वर्षांपूर्वी अवैधधंद्या विरोधात केलेले आंदोलन
दिलीप (पाचोरा)
दिनांक१८/११/२०२०
आंबे वडगाव ,आंबे वडगाव खुर्द,आंबे वडगाव बुद्रुक या गावात मागील तिन वर्षापासून सट्टा, पत्ता, गावठी व देशीदारुची अवैध विक्री भरवस्तीत ,रस्त्यावर खुलेआमपणे सुरु आहे.
याबाबतीत गावातील ग्रमस्थ व महिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तसेच जिल्हास्थरावर व दारुबंदी अधिकारी याच्याकडे वारंवार तक्रारी देऊनही वरील अवैधधंदे बंद होत नसल्याने
आंबे वडगाव व गाव परिसरातील घराघरातून व्यसनाधीनता वाढत जाऊन तरुण व अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेले लोक , तरुण मुले ,अल्पवयीन मुले व्यसनपूर्तीसाठी घरातील किंमती वस्तू ,धनधान्य विकुन सट्टा ,पत्ता ,दारु या व्यसनात पैसा गमावत असल्याने घराघरात बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने घरातील महिला व बालगोपालांवर उपासमारीला सामोरे जावे लागते. यातुनच घराघरात भांडणे होणे ही नित्याचीच बाब झाली आहे.तर काही महिला दारुड्यांना वैतागून माहेरी निघून गेल्या आहेत. तसेच दारुडे लोक दारु पिऊन गल्लीत व गावात धिंगाणा घालतात व दारु पिण्यासाठी पैसे पैसे मागतात पैसे न दिल्यास दमदाटी व शिवीगाळ करतात तसेच दारूबंदीसाठी आवाज उठवणाराला दमदाटी करुन खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात.
या वरिल कारणाने गावपरिसरातील वातावरण दुषीत होऊन अशांतता पसरली आहे.म्हणून महिलावर्ग व सुज्ञनागरीकातुन तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन आपणही समाजाचे काही देणे लागतो म्हणून आंबे वडगाव तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य व दारुबंदी अध्यक्ष चरणसिंग महारु राठोड यांनी आता अवैधधंदे बंद करण्यासाठी विडा उचलला असून त्यांनी अवैधधंदे बंद न झाल्यास दिनांक २७ नोव्हेंबर शुक्रवार पासून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे (पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन), डी.आय.जी. सो.प्रताबराव दिघावकर (नासिक), जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री. प्रविणजी मुंडे (जळगाव), मा.डी.वाय.एस.पी.सो.ईश्वरजी कातकडे (पाचोरा)तसेच तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोरआप्पा पाटील. याना दिले असून चरणसिंग महारु राठोड हे दिनांक २७ नोव्हेंबर पासून हरेश्वर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
( चरणसिंग राठोड यांनी घेतलेल्या निर्णयाचे गावपातळीवर समर्थन केलेजात असून असंख्य माताभगिनींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.)
【पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन व लोहारा दूरक्षेत्र परिसरात वारंवार धाडसत्र राबविण्यात आले आहे.व आजही माहिती मिळाल्यानंतर मी स्वता व सहकार्यांना पाठवून कारवाई करत असते.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही तक्रारी आल्यानंतर लगेचच दखल घेतली जाते. परंतु काही वेळा कार्यालयीन कामकाज , सन ,उत्सव व इतर बंदोबस्त कामे आल्यावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने काही ठीकाणी जाणे शक्य होत नाही.तरीही अवैधंद्यांना आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.असा खुलासा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी सत्यजित न्यूजला दिला आहे】