सोपान गव्हांडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०३/२०२१
जळगाव- येथील राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे सोपान पुंडलिक गव्हांडे-पाटील (घोसला, ता.सोयगाव) यांना ‘जीवन गौरव पुरस्कार २०२०~२१’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे.
सोपान गव्हांडे हे मुंबईतील अनेक सेवाभावी संस्था, संघटनांच्या माध्यमातून मुंबईत व गावाकडे विविध सामाजिक कार्य करीत आहेत. ते मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिसरातील विविध प्रकारच्या संकटग्रस्तांना वेळोवेळी मदत उपलब्ध करुन दिली. विधवा महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांनी आर्थिक दु्ष्ट्या सक्षम व्हावे, म्हणून परिसरातील १०० महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप केल्या. या महिलांना शिलाईचे प्रशिक्षणही देण्यात येतेय. पाणीटंचाईच्या काळात अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिर घेतले. सोयगाव तालुक्यातील २२ खेड्यांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे मोफत वितरण करण्यात येते. तर अनाथ आश्रमांना देखील मदतीचा हात दिला जातो.
कोरोना कालावधीत मु्त्यू झालेल्या रुग्णाच्या मुलीच्या शिक्षणासाठी देखील ते आर्थिक हातभार लावत आहेत. या उल्लेख सामाजिक कार्याची दखल घेऊन गव्हांडे यांना राजनंदिनी संस्थेतर्फे ‘जीवन गौरव पुरस्कार २०२०~२१’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल, असे संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी सांगितले.