समाजसेवक सुमित पंडित यांना श्री.गजानन महाराज “सेवा गौरव” पुरस्कार जाहिर
दिलीप जैन.(पाचोरा)
१८/११/२०२०
श्री.वैष्णव परिवार बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजसेवक सुमित पंडित यांना श्री.गजानन महाराज “सेवा गौरव” पुरस्कार जाहीर झाला आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नवचैतन्य व्यसनमुक्ती केद्राचे मुख्य संचालक ह.भ.प.मावली महाराज शेलुदकर यांनी पुरस्कार जाहिर झाल्याचे निवडपत्राद्वारे कळवीले आहे.
या पुरस्काराचे स्वरुप शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र टा्फि ५०५१ रु रोख रक्कम देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करन्यात येनार आहे.सुमित पंडित यांच्या विविध समाजोपयोगी लोकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांच्या या अनोख्या समाजसेवेचे तरुणांना प्रेरणादायी आहे ते म्हणतात “दुनिया मे आकर कमाया खूप हिरे-मोती मगर कफन मे जेब नही होती” या म्हणीप्रमाणे ते अहोरात्र दीनदुबळ्यांची गोरगरिबांची सेवा करत असतात लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये त्यांनी गोरगरीबांना औषध मेडिकल जेवण आर्थिक मदत व बेवारस निराधारांची दाढी-कटिंग करून रुग्णालयात नेणे सैनिकांसाठी चांदीचा वस्ताऱ्याने मोफत सलुन सेवा,बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत सलून सेवा मोफत सलून मध्ये वाचनालयाची अनोखी सेवा अशा कितीतरी सेवा कार्यांमध्ये अग्रेसर आहेत त्यांनी नुकताच कितीतरी बेवारस मनोरुग्णांना येरवडा पुणे येथे आपल्या हक्काची जागा मिळवून दिली आहे.ह्या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत श्री.वैष्णव परिवार बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व नवचैतन्य व्यसनमुक्ती केद्राचे मुख्य संचालक ह.भ.प.मावली महाराज शेलुदकर यानी सुमित यांच्या कार्याची दखल घेवून
या “सेवा गौरव” पुरस्कारामुळे समाजात सुमित पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित चा हा ५५ वा पुरस्कार आहे.या आधी त्यांना विविध ५४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार सोहळा संत गजानन महाराज संस्थान शेलुद ता.भोकरदन जी.जालना येथे दि.१९-११-२०२० रोजी सकाळी ११:०० वा होनार आहे.