भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव खान्देशात मोठ्या उत्साही वातावरणात_साजरा होणार.
गौरव जैन.(नेर कुसुंबा)
दिनांक~१२/०४/२०२२
अहिंसेचे महान पुजारी, जगा आणि जगू द्या असा जगाला संदेश देणारे, विश्वशांतीचे उद्गाते जैन धर्मातील २४ तीर्थंकरां पैकी अंतिम तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा दिनांक १४/ ०४-/२२ गुरुवार रोजी जन्म कल्याणक दिनानिमित्त महोत्सव खान्देशातील विविध गावात सोनगीर ,कुसुंबा, कापडणे, बेटावद ,शिरसाळे, पारोळा, शेंदुर्णी, दहीगाव ,पिंपळगाव (हरेश्वर )आदी गावात हा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साही मंगलमय वातावरणात संपन्न होणार आहे.
त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खान्देशातील विविध गावातील उत्सव कार्यकर्ते आणि समाजाचे प्रतिनिधींची सस्नेह चर्चा व भेटी अंती खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख खान्देश जैन पत्रकार आणि कुसुंबा अतिशय क्षेत्राचे विश्वस्त सतिष वसंतीलाल जैन यांनी दिली.
भगवान महावीर स्वामींच्या तत्त्वप्रणालीची आजची सामाजिक गरज लक्षात घेता त्यांच्या तत्त्वज्ञानाचे प्रसार प्रचार करणे, प्रातःकाली प्रभात फेरी काढून जनजागृती करणे लॉट लोकोपयोगी समाजोपयोगी कार्य मंदिरात अभिषेक, विश्वशांती सुख-समृद्धीसाठी व सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी शांतीमंत्र वाचन, महिला पुरुषांतर्फ गटागटाने भगवान महावीर स्वामींचे पूजन पाठ, २४ तीर्थंकर पूजा, भव्य मिरवणूक त्यात विविध सजीव देखावे कार्यक्रम, पालखी, भव्य मिरवणुकीत महीलावर्ग केसरी साडी परिधान केलेले. पद्मावती युवा मंच गणवेश परिधान करून विशेष मिरवणूकीचे आकर्षण, आदी विविध कार्यक्रम विविध गावात दिवसभर आयोजित करण्यात आले आहेत.
या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कधी ना येणारे श्रावण श्राविका मात्र या वेळेस मंदिरात येऊन भगवान महावीर स्वामींचे दर्शन अवश्य घेत असतात.या महोत्सवात अलभ्य लाभ घेऊन आनंद द्विगुणित करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळ व शासनाच्या आदेशान्वये घरगुती वातावरणात हा महोत्सव संपन्न झाला होता. यावर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे समाजबांधवात उत्साह संचारल्यामुळे भव्य व दिव्य जन्म कल्याणक महोत्सव विविध गावात साजरा होणार असल्याचे समाज बांधव बोलताना दिसून येत आहेत.