भडगाव शहरातील विविध भागात कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निधीतुन बसण्याचे शेकडो बाकड्यांचे झाले वितरण
दिलीप जैन. ( पाचोरा )
भडगाव शहरातील विविध कॉलनी भागात व चौकात कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निधीतुन शिवसेनेतर्फे शेकडो बाकडे वितरण करण्यात आले.
भडगाव तालुक्यातील विविध ठिकाणी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी सामाजिकता जोपासत शहरातील कॉलनी विविध चौकात बैठकी बाकडे वितरीत करून दुर्लक्षित असलेल्या या चौकातील कट्ट्यांना सुशोभीकरण करून दिले आहे.
मागील महिन्यात १११ बाकडे व आता ७१ बाकडे असे एकूण १८२ बाकडे शहरात वितरित करण्यात आले आहेत.
सकाळी व सायंकाळी नागरिकांना काही वेळ विरंगुळा म्हणुन शांतपणे बसता येणार आहे व नागरिकांना सामाजिकता जोपासता येईल आणि गप्पा गोष्टी करता येणार आहे या उद्देशाने शहरातील शनी चौक , खोल गल्ली,बाजार चौक, बालाजी गल्ली,बस स्थानक, तहसीलदार कार्यालय,उज्ज्वल कॉलनी,खालची बर्डी,वरची बर्डी,संत सेना महाराज मंदिर भाग,भोईवाडा,बाळद रोड भागातील कॉलनी भाग, चाळीसगाव रोड आदी ठिकाणी बाकडे वाटप करण्यात आले.