अंबे वडगाव येथून पिकप बोलेरो गाडीची चोरी, पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२२
अंबे वडगाव येथून पिकप बोलेरो गाडीची चोरी झाल्याची घटना नुकतीच घडली याबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सावखेडा येथील संजय धोंडुसिंग परदेशी यांच्या मालकीची पिकप बोलेरो गाडी नंबर एम.एच/४८ जी/ ०५८० ही गाडी असून संजय परदेशी यांनी ही गाडी भडगाव तालुक्यातील जुवार्डी, वाडे या गावाहून अंबे वडगाव येथील जोगे फाट्यावर असलेल्या डेअरी मध्ये दुध वाहतूकीसाठी भाडेतत्त्वावर चालवतात. या गाडीवर चालक म्हणून अंबे वडगाव येथील देवानंद रघुनाथ कोळी हा चालक कामावर असल्याकारणाने हा चालक दुध वाहतूक झाल्यानंतर आपल्या ताब्यातील पिकप बोलेरो गाडी ही जामनेर ते पाचोरा रस्त्यावर तानाजी हरी पाटील यांच्या घराजवळ मोकळ्या जागेत उभी करुन घरी झोपण्यासाठी जात होता.
असेच दुध वाहतूकीचे काम संपल्यानंतर याने नियमितप्रमाणे दिनांक १३ जून २०२२ सोमवार रोजी रात्री अंदाजे ११ वाजेच्यासुमारास तानाजी पाटील यांच्या घराजवळ गाडी लावून घरी झोपण्यासाठी गेला होता. नंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे मंगळवार रोजी हा पुन्हा दुध घेण्यासाठी गाडी घेऊन जायचे म्हणून रात्री गाडी उभी केलेली होती त्याजागी आला मात्र तेथे आल्यावर त्याला गाडी दिसून न आल्यामुळे त्याने जवळपासच्या लोकांना विचारपूस केली मात्र काहीच माहिती मिळत नसल्याने याने हा प्रकार गाडी मालक संजय परदेशी यांना भ्रमणध्वनीवर कळवला लगेच संजय परदेशी यांनी अबे वडगाव गाठून घडलेला प्रकार समजून घेत बराचवेळ गाडीची शोधाशोध सुरू केली मात्र गाडी सापडत नसल्याने सरतेशेवटी मंगळवार रोजी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली असून गाडी चोरीला गेली तेव्हा गाडीमध्ये ०४ प्लास्टिकच्या, ०६ ॲल्युमिनियमच्या ०५ लोखंडाच्या कॅन होत्या या चोरीप्रकरणी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस कसून शोध घेत आहेत.