पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यांच्याकडे निघालेल्या वसुली थकबाकी प्रकरणी माजी संचालक अडचणीत येण्याची शक्यता ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/१०/२०२१.
पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती माजी संचालक यांच्या कडील वसुली प्रकरणात आज सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी संपन्न. झाली या सुनावणीच्या वेळी बाजार समितीच्या वतीने प्रशासक अनिल महाजन बाजू मांडणार असून सदर प्रकरणात पार्टी करून घेणे बाबत अनिल महाजन यांचा अर्ज सहकार मंत्री यांनी मंजूर केला आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यांच्याकडे निघालेल्या वसुली थकबाकी प्रकरणी माजी संचालक अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पाचोरा आणि भडगाव येथिल शेतकऱ्यांच्या हितासाठी असणारी स्वराज्य संस्था पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समिती असून या समितीवर कुठलेही संचालक मंडळी येईल आणि मनमानी कारभार करेल, नको तो जास्तीचा भेटी,समारंभ,खर्च प्रवास खर्च करेल नको ती बिले टाकतील बाजार समितीवर आर्थिक ताण पडेल जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतील असे अजिबात खपवून घेणार नाही अशी भुमिका अनिल महाजन, प्रशासक पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी घेतली आहे.
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०१०/११ माजी संचालकांकडे निघालेल्या वसुली प्रकरणात आज मंत्रालय मध्ये सुनावणी झाली आहे. बाजार समितीचे प्रशासक अनिल महाजन यांची सदर प्रकरणामध्ये समावेश करून घेण्या बाबत प्रशासक म्हणून यांचे म्हणणे सहकार मंत्री यांनी ऐकावे याबाबत अर्ज दिला होता.
पाचोरा बाजार समितीच्या माजी संचालकावर जास्तीचा खर्च केल्या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. अंदाजे एकूण ७० लाखाची रक्कम ह्या संचालक यांच्या कडे निघत आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सदर वसुली माफ करण्यासाठी मंत्रालयत धाव घेतलेली आहे. त्याबाबत अपील फाईल केले आहे. त्या अपिलाचे आज सुनावणी झाली असता सदर सुनावणी दरम्यान बाजार समितीचे प्रशासक अनिल भाऊ महाजन यांनी सहभाग नोंदवत लेखी अर्ज दिला होता.
या अर्जाची दखल घेत सदर प्रकरणात पार्टी होण्यासाठी व बाजार समितीच्या हिताचे म्हणणे ऐकुन घेण्यासाठी सुनावणी दरम्यान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अनिल भाऊ महाजन यांचा अर्ज मंजूर करुन घेत व लेखी म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला आहे.
तसेच पाचोरा बाजार समिती तर्फे युक्तिवाद कोण करणार आहे कशी विचारणा केली असता युक्तिवाद मी स्वता करणार असल्याचे अनिल भाऊ महाजन यांनी सांगितले.तसेच पुढील तारखेला सुनावणी दरम्यान अनिल भाऊ महाजन स्वता युक्तिवाद करणार आहेत.
या सुनावणीदरम्यान माजी संचालक शांताराम धनराज पाटील व इतर यांच्यातर्फे वकील बापू शैंदाणे यांनी काम पाहिले व बाजार समितीतर्फे सचिव बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते. अशी माहिती अनिल भाऊ महाजन, प्रशासक पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कळवली आहे.