राजकारणात सेवा,नैतिकता,संवेदशिलता जपणारा आपला एकमेव माणूस म्हणजे विकास पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२२
पाचोरा तालक्यातील राजकारणात समाकारणात, समाजकारणात, गोरगरीब, वृध्द, महिला,हयुवक, कामगार, कुणीही असो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणारा प्रामाणिक माणूस अशी उंच प्रतिमा असलेला निस्पृह, निगर्वी, कायम जनतेत आणि जमिनीवर असलेला सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व असलेला माणूस म्हणजेच विकास पाटील.
अगदी महाविद्यालयीन जीवनापासून प्रचंड धडपड करणारा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, तसेच उपेक्षित प्रश्न कोणतेही असो स्वतःच बुद्धिमत्तेचा कौशल्य वापरून प्रश्न सोडविणार माणूस अशी स्वच्छ प्रतिमा हजरजबाबी, स्पष्टवक्ता, बूथ रचना ते सभा गाजविण्या पर्यंत आपल्या कामाचा ठसा उटविणारे बहुआयामी व्यक्तिमत्व स्पष्ट विचारसरणी जे बोलणे तेच वागणे (बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले) प्रसंगी काहीही किंमत चुकवावी लागेल तरी चालेल अशी व्यक्ती गरजूंना रेशनकार्ड, गोरगरीबांना पगार, आधार, मतदान कार्ड, काम कोणतेही असो याबाबत समस्या मांडण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी उत्तर एकच विकास पाटील.
एका वॉर्ड, प्रभगापेक्षा संपूर्ण तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडिण्यासाठी
तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, नगरपालिका, सिटी सर्व्हे, सरकारी दवाखाना, विद्युत वितरण कंपनी अशा कोणत्याही सरकारी कार्यालयात मुक्तपणे त्यांचा वावर असतो आजच्या सध्याच्या पैश्याच्या जीवावर चालणाऱ्या राजकारणात सुद्धा काम करणारा माणूस अशीच प्रतिमा त्यांची आहे. एक लोकप्रतिनिधींनी, सामाजिक कार्यकर्ता, म्हणून त्यांची विशेष ओळख पाचोरा तालुक्याला आहे.
पक्ष,हसंघटना, विचारसरणी, कोणतीही असो युवक वर्ग त्यांचा चाहता आहे. सर्व स्थरावर सगळ्या ठिकाणी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जात, पात, धर्म, पक्ष या विचारसरणीपेक्षा माणूस महत्वाचा असतो असे त्यांचे विचार आहेत. कोरोना काळात जीवावर उदार होऊन त्यांनी केलेलं काम ही त्यांची सामाजिक बांधिलकी, व संवेदनशीलता दर्शविते. बुद्ध, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची मानवतावादी, बहुजन हिताय, बहुजन सुखाय विचारसरणी हाच त्यांचा प्रमुख पाया आहे. कोणताही राजकीय वारसा नसतांना त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आणि कार्यकर्ते व मित्र परिवाराला सर्वांगीण प्रगती साठी स्वतःला झोकून दिलं.
‘यशाला शॉर्टकट नसतो’
त्यासाठी कष्ट,मेहनत,घ्यावी लागते विश्वास निर्माण करावा लागतो
हीच भूमिका त्यांनी कायम घेतली आणि सर्व मित्र परिवराला दिली
प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येक कुटुंबाचा आपण घटक आहोत हेच त्यांचे आचरण सांगते विचारात मतभेद असावेत पण मनात मनभेद नसावेत अशीच त्यांची धारणा असो मला जे दिसल ते ते लीहण्या चा मी प्रयत्न केला आहे. त्यांच्या वाढिवसानिमित्त मी प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा या विकास पाटील या अवलियाला
परमेश्वर उदंड आरोग्यमंय आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
शब्दाकन –
अनिल आबा येवले. (पत्रकार)