श्री. क्षेत्र प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीत दिनांक २६ नोव्हेंबर रोजी २७९ वा श्री. विठ्ठल, रुख्मिणी रथ सोहळ्याचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२३

आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीत श्री. संत तुकडोजी महाराजांनी सुरु केलेला श्री. विठ्ठल, रुख्मिणी रथ सोहळा व पालखी सोहळा आजपर्यंत श्री. संत तुकडोजी महाराज संस्थान शेंदुर्णी व सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने मागील २७७ वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे.

आता यावर्षीचा म्हणजे २७९ वा रथ व पालखी सोहळा येत्या २६ नोव्हेंबर २०२३ रविवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तरी शेंदुर्णी नगरीसह पंचक्रोशीतील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व भाविक, भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहुन दर्शनाचा लाभ घ्यावा व रथ सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री. संत तुकडोजी महाराज संस्थान व शेंदुर्णी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या