जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत वडगाव आंबे येथे संपर्क अभियान शाळापूर्व मेळावा संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत आजरोजी संपर्क अभियान व शाळापूर्व मेळावा क्रमांक दोनचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे आयोजन करण्यामागील उद्देश हाच की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६~२७ पर्यत भाषिक कौशल्य व मूलभूत क्षमता सर्व विद्यार्थांना प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमल बजावणी करण्याच्या दृष्टीने निपूण भारत कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळास्तर मेळावा क्रमांक दोनचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन गावातील लोकप्रतिनिधी तसेच पालक मा. श्री. उत्तम चव्हाण, समाधान पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस व बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच शिक्षणप्रेमी मा. श्री. शशिकांत हिंमत पाटील.(वाघ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नंतर शाळेत नव्यानेच दाखल झालेले विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते मोफत पुस्तके वाटप करुन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती चंद्रभाग सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन मा. श्री. राजू पटेल सरांनी केले या मेळाव्याचे यशस्वीतेसाठी श्रीमती वृशाली सोनार व मा. श्री. दिनेश पाटील या उपशिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.