पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची आंबे वडगाव येथे दारु विक्रेत्यांवर कारवाई, महिलावर्गातून समाधान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२३

काल दिनांक १० ऑक्टोंबर २०२३ मंगळवार रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित पाटील व संदीप राजपूत यांनी वडगाव आंबे येथील एक बियर शॉपी जवळ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील दिपक नाना पाटील, आंबे वडगाव येथील अविनाश सुभाष कोळी व आंबे वडगाव तांडा येथील कांताबाई प्रमसिंग राठोड या अवैध दारु विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून अवैधरित्या दारु विक्री करतांना रंगेहाथ पकडले असून कायदेशीर कारवाई केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

परंतु या कारवाईबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनकडून आत्तापर्यंत सविस्तर माहिती मिळाली नसल्याने याठिकाणी किती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तसेच संबंधित दारु विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करण्यात येत असली तरी कायद्यातील पळवाटा शोधून हे अवैध दारु विक्रेते परत, परत त्याच ठिकाणी तोच व्यवसाय सुरु करत असल्याने नियमानुसार यांच्यावर एम. पी. डी. ए. अंतर्गत कारवाई करण्यात यावी म्हणजे कायमस्वरूपी दारुबंदीसाठी यश येईल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

तसेच आंबे वडगाव येथील देशी व गावठी दारुची अवैध विक्री तसेच सट्टा बेटिंगचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी आंबे येथील महिलावर्गातून केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या