कुसुंबा येथे प्राकृत दिनानिमत्त ग्रंथ दिंडी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न.
गौरव जैन.(कुसुंबा)
दिनांक~०५/०६/२०२२
कुसूंबा येथे सकल जैन समाज बांधवाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही मंगलमय वातावरणात श्रुतपंचमी अर्थात प्राकृत दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आल्याची माहिती खानदेश जैन समाजाचे प्रसिद्धी प्रमुख सतीश वसंतीलाल जैन व महेंद्र जैन यांनी दिली.
या दिनानिमित्त कुसुंब्यात महावीर मार्गावरील प्राचीन शताब्दी पूर्वीचे प्राचीन दिगंबर जैन मंदिरात प्राचीन शास्त्र ग्रंथ एका मंचावर ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी अनेकांनी शास्त्राची पूजा केली लहानापासून थोरापर्यंतांनी या पूजेच्या अलभ्य लाभ घेतला. ज्ञानात वृद्धिव्हावी अशी भावना व्यक्त केली. प्रातः काली अभिषेक पूजन विश्वशांती साठी व सुख-समृद्धीसाठी कल्याणकारी शांतीमंत्र विपुल जैन यांच्या सुमधुर बिंदूतून करण्यात आला.
याप्रसंगी पद्मावती युवामंचचे सदस्यांनी इंद्र बनवून अभिषेक व शांतीधारा केली आदी धार्मिक विधी संपन्न झाला. नंतर पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने जैन बांधवांनी शास्त्र ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करून नंतर त्यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांचे नेत्रांचे पारणे फेडणारा हा पालखीत्सोव पानाफुलांनी सुशोभित पालखीसोबत आदी पथकामुळे मोठा उत्साह पाहावयास मिळाला.
या पालखी सोहळ्याचे प्रसंगी जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला. मार्गक्रमण होत असताना घरोघरी प्राचीन ग्रंथाची आरती करण्यात येत होती तर काही भक्तगण वंदनकरून अर्घचढवुन आपले भाव व्यक्त करत होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. भाविकांचे नेत्रांचे पारणे फेडणारी हा भव्य पालखी सोहळा होता. भाविकांमध्ये अपार उत्साह पाहावयास मिळाला पालखी आपल्या दारासमोरुन जात असतांना अनेकांनी फुलांचा वर्षाव करत जिनवाणी माता की जय असा जयघोष केला.
याच दिवशी जुने ग्रंथासाफ करून त्यांना वेष्टण घातले गेले तसेच नवीन शास्त्रग्रंथ विकत घेतले नित्यनियमाने स्वाध्याय करण्याचा संकल्प केला जातो हे शास्त्रग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांची तीर्थंकरांची वाणी शब्दबद्ध असल्याची जैन बांधवांची श्रद्धा आहे संस्कृतीचा आधार असलेल्या शास्त्र ग्रंथाचे संरक्षण संवर्धन व्हावे हा त्याचा खरा उद्देश आहे.प्रतिष्ठाचार्य प्रदीप शास्त्रीचे विशेष प्रेरणा व मार्गदर्शनाने कार्यक्रम संपन्न झाला.