लोहारी गाव व शेत शिवारात माकडांचा धुमाकूळ ग्रामस्थ भयभीत. वनविभाग कुंभकर्ण झोपेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारी गावात व शेतशिवारात मागील दोन दिवसापासून धुमाकूळ घातला असून ही तीन ते चार माकडे सरळसरळ मानवी वस्तीत घुसून घरांच्या छतावर किंवा अंगणात येऊन थेट घरात घुसतात व घरातील खाद्यपर्थावर ताव मारतात यांना जर कोणी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तर ही माकडे थेट अंगावर धाऊन येतात व चावा घेतात.
तसेच लोहारी गावचा परिसर हा ग्रामीण परिसर असल्याने शेतात जाणाऱ्या मजुरांची संख्या जास्त प्रमाणात असून यात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात असतात. हे मजूर शेतात जातांना आपली न्याहारी सोबत घेऊन जात असतांनाच ही माकडे या मजुरांना अडवून किंवा अंगावर धाऊन येत भाकरी पळवण्याचा प्रयत्न करतात व यांना विरोध केल्यास ते चावा घेत असल्याने आतापर्यंत पायी चालणारे तसेच सायकलीवर प्रवास करनारांना शेतात जाणाऱ्या चार ते पाच लोकांना या माकडांनी चावा घेतला आहे.
बाबुलाल लतीफ तडवी या वयोवृद्ध शेतमजूरावर माकडाने हल्ला केला होता त्यांना ईतर लोकांनी वाचवले त्यांच्या पायावर माकडाची लागलेली नखे छायाचित्रात दिसत आहेत.
या माकडांच्या भितीने मजूर वर्ग धास्तावला असून दैनंदिन कामासाठी शेतात जाणे बंद केले आहे. तसेच लहान मुलांना या माकडांचा जास्त धोका असल्याने लहान मुलांना घराबाहेर निघणे मुश्कील झाले आहे.
या माकडांचा बंदोबस्त होण्यासाठी लोहारी येथील सतीष पाटील यांनी पाचोरा वनविभागाचे भिलावे साहेब यांना भ्रमणध्वनीवर माहिती दिल्यावरही अद्यापपावेतो माकडांचा बंदोबस्त करण्यात आलेला नसल्याने वनविभागाचे दिरंगाई बद्दल नाराजी व्यक्त केली आहे.