वनविभागाचा अजब फंडा, शिकार हरणाची पंचनामा (शेळी) बकरीचा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२२
पाचोरा व जामनेर वनविभागातील कार्यालयात मनमानी कारभार चालला असून या दोघीही तालुक्यातील राखीव जंगलात तसेच शेत शिवारात व तहसील हद्दीत असलेल्या हिरव्यागार महाकाय वृक्षांची विनापरवानगी दिवसाढवळ्या स्वयंचलित लाकुड कटरच्या साह्याने दररोज शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे.
ही परिस्थिती पाहून व निसर्ग संपदा वाचवण्यासाठी निसर्गप्रेमींनी वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही कोणतीही कारवाई होत नसल्याने वृक्षतोड थांबवण्यासाठी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवून झोपलेल्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
या वृत्ताची दखल घेत वनविभागाने थातुरमातुर कारवाई करण्याला सुरवात केली आहे. मात्र ही कारवाई करतांना ज्याठिकाणी हिरव्यागार निंबाच्या व आंब्याच्या झाडांची कत्तल होत आहे. तेथे पंचनामा करतांना सुळबाभुळ, पळस, बेहडा, बाभुळ, उंबर, पिंपळ व इतर आडजात झाडे होती असे दाखवून थातुरमातुर पंचनामा करुन केलेल्या पापावर पांघरुण घालत लाकुड व्यापाऱ्यांची पाठराखण केली जात असून जातिवंत वृक्षांची तोड होत असल्याने शिकार हरणाची पंचनामा बकरीचा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
[#असाच काहीसा प्रकार कोल्हे येथील बाफणा कृषी विद्यालयाच्या जवळच असलेल्या एका शेतातील कापलेल्या झाडांचा पंचनामा करतांना कापलेल्या निंबाच्या झाडांचा पंचनामा करतांना त्या ठिकाणी बाभळीची व इतर आडजात झाडे होती असा दाखला देत पंचनामा करुन केलेल्या पापावर पांघरुण घालण्यासाठी प्रयत्न केला गेला असल्याची चर्चा कोल्हे गावातून ऐकावयास मिळत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतातील हिरव्यागार नितंबाच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे तो शेतमालक स्वतः वनविभागातील कर्मचारी असल्याकारणाने कोणतीही परवानगी न घेता हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कटाई करत आहेत. मात्र सत्यजित न्यूज वारंवार आवाज उठवत असल्याकारणाने आज रोजी काही ठिकाणी वृक्षतोडीचे पंचनामे करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तसेच बऱ्याचशा ठिकाणी अगोदर वृक्षतोड व नंतर गरज भासलीच तर मग परवानगी दिली जाते आहे.#]
एकाबाजूला दिवसाढवळ्या विनापरवाना हिरव्यागार वृक्षांची कत्तल होत असतांना दुसरीकडे जिल्हा व तालुकास्तरीय जबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधी झोपेच सोंग घेऊन हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून आपली जबाबदारी टाळतांना दिसून येत आहेत. या कारणांमुळे थोड्याच दिवसात पृथ्वी वरील निसर्गसंपदा नष्ट होण्याची भीती सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.