सावखेडा खुर्द विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या सहकार पॅनलचा दणदणीत विजय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीत दिनांक ०५ जून २०२२ रविवार रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपा प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत महा विकास आघाडीच्या सहकार पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत महा विकास आघाडीचे सहकार पॅनल हे पतंग व भाजपा प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनल हे कपबशी या निशानीवर निवडणूक लढवीत होते. या निवडणुकीत आज दिनांक ०५ जून २०२२ रविवार रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्वसाधारण मतदारसंघातून जाधव दिनेश अमृत, परदेशी जयसिंग महादु, परदेशी जिभाऊ बन्सीलाल, परदेशी प्रेमचंद फुलचंद, परदेशी संदिप धनसिंग, परदेशी संजय रंगलाल, पाटील दिनकर दौलत, पाटील संदिप श्रीराम महिला राखीव मतदार संघातून परदेशी कांताबाई गोकुळ, पाटील सविता पितांबर, इतर मागासवर्गीय मतदार संघातून पाटील ईश्वर आनंदा,हअनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून तडवी आखाडु ईमाम, विमुक्त भटक्या जमाती मतदारसंघातून परदेशी कैलास देवचंद यांनी भरघोस बहुमत मिळवून आपल्या प्रतिस्पर्धी शेतकरी परिवर्तन पॅनलवर विजय मिळवला.
तसेच भाजपा प्रणित शेतकरी परिवर्तन पॅनलच्या न्हावी राजु पंडीत, परदेशी पाचाबाई विठ्ठल, परदेशी सुनिल भरत, परदेशी सरलाबाई गोकुळसिंग, परदेशी अमरसिंग शामलाल, परदेशी आण्णा यादव, पाटील रविंद्र बाजीराव, परदेशी गणेश रुपचंद, तडवी नशिर इमाम, परदेशी रुपचंद बालचंद, परदेशी सुधिरसिंग रामसिंग, परदेशी ईश्वर हरचंद, पाटील पंढरी दयाराम यांना कमी मते पडल्याने हार मानावी लागली.