शिंदे इंटरनॅशनल स्कुलतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०८/२०२२
पाचोरा शहरातील गिरणाई शिक्षण संस्था संचालित शिंदे इंटरनॅशनल स्कुल या सी.बी.एस.ई बोर्डच्या शाळेत भारताच्या ७५ व्या स्वांतत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासन निर्णयानुसार आज दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी प्रभातफेरीचे (तिरंगा रॅली) आयोजन करण्यात आलेले होते.
सदर प्रभातफेरी ही पाचोरा शहरातील शिवतीर्थ मैदानापासुन ते छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत आयोजित करण्यात आलेली होती. त्यानिमित्त शाळेतील वर्ग इ.१ ली ते इ. १० वी च्या विद्यार्थी सहभागी होते. या प्रभातफेरीत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर अगदी दूमदूमून गेला. प्रभातफेरीत सहभागी विद्यार्थ्यांचा जल्लोष त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. या प्रभातफेरीत शाळेचे प्राचार्य डॉ.विजय गोरख पाटील यांनी सर्वाना प्रभातफेरीचे महत्व पटवून दिले तसेच सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी मदत केली. या प्रभात फेरीचा समारोप वंदे मातरम ने करण्यात आला.