प.पु. १०८ सुदेह सागर जी महाराज यांचे पाऊले चालती मांगीतुंगी मार्गे कुंभोज बाहुबलीच्या वाटेवर जल्लोषात निघालेल्या यात्रेत शेकडो भाविक सामील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२१
कुसुंबा येथील चातुर्मास समापन नंतर प.पु. सुदेह सागर जी दिगंबर जैन मुनि श्री यांनी येथून दिनांक २३ मंगळवार रोजी पाऊले चालती मांगीतुंगी सिद्धक्षेत्र मार्गे कुंभोज बाहुबली च्या वाटेवर (कोल्हापूरकडे) मार्गे मंगल विहार केला. प्रदीप जैन ( मधुर शास्त्री) यांच्या नूतन निवास ग. नं. ३ मधील स्वाध्याय भुवन येथे पुज्यश्रींचा चातुर्मास निमित्त वास्तव्य होते. दुपारच्या प्रवचनानंतर तीन वाजून दहा मिनिटांनी स्वाध्याय भुवन येथून निघून श्री १००८ कुंथूनाथ दिगंबर जैन मंदिराच्या दर्शना नंतर , महावीर चौक वरून गावातील प्रमुख मार्गावरून (साक्री रोड वरून) नेर येथे मुनीश्री सोबत संघाने पहिला मुक्काम केला असल्याची माहिती चातुर्मास समितीचे, कुसुंबा जैन अतिशय क्षेत्राचे विश्वस्त व खान्देश जैन समाजाचे प्रसिद्धीप्रमुख व पत्रकार सतीश वसंतलाल जैन ( कुसुंबा) यांनी यांनी दिली.
मुनीश्रींना निघण्यापूर्वी शेकडोच्या संख्येने उपस्थित स्ञी, पुरुष भाविकांना संबोधित केले. गुरु भक्तीच्या गीताने मंगलाचरण झाले यावेळी बोलताना मुनिश्री म्हणाले “चरवेती चरवेती” म्हणजे सतत चालत रहा ही धर्माने दिलेली आज्ञा आहे. साधू धर्माचे पालन करणारे फार काळ एकाच जागी कायम वास्तव्य करू शकत नाहीत. मात्र कुटुंबवत्सल गृहप्रमुखाने याउलट चंचल होऊन इकडे तिकडे भटकता कामा नये. तरच त्याचा संसार सुखाचा होईल.
तुम्ही जिथे जाल तिथे नीतीमत्तेने जगायला शिका. प्रतिदिन स्वाध्याय पूजा अभिषेक करा व वात्सल्यभाव ठेवा द्वेष करू नका आदि पाच तत्वे पालन करण्याचे सांगितले. तरच जीवनात बदल घडेल व आदर्शाचे तुमचे मापदंड तुमच्या अस्तित्वाला समृद्ध संपन्न बनवतील. वर्षा योगाच्या काळात समाजात एक नवीन प्रेरणा जागृत झाली. शाश्वत सुखाचा मार्ग सांगितला आगळेवेगळे चैतन्य निर्माण झाले. बालकांमध्ये नैतिकता व सद्गुणांचे बीज पेरले गेले आत्मबळ वाढविण्यासाठी एक उत्तम अशी वेळ काळ होती.
सत्संगात राहिल्याने अनेक जणांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आले. वृद्धांमध्ये विरक्त व संन्यासाची भावना जागृत झाली जी तपस्या ती व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात करू शकत नाही ती तपस्या त्या चातुर्मासात झाली. जो अध्यात्म अभ्यास तो इतर दिवशी करू शकत नाही तो अभ्यास तो या काळात करू शकला. साधू-संत जिथे ही जातात तो परिसर ती भुमी सोन्यासारखी होऊन जाते आणि जेव्हा ते तिथून प्रस्थान करतात तेव्हा सुने सुने वाटू लागते हे सत्य असले तरी साधूंनी ही धर्माचा संदेश देण्यासाठी सतत चालत राहायला हवे आयुष्यात कधीही कमकुवत राहू नका पुरूषार्थाने जगायला शिका. “चरवेती” चा अर्थ चांगल्या कार्यासाठी चांगल्या सहकार्यांसोबत चालत राहा यातून तुमचे भाग्य उज्ज्वल होईल जीवनाला सामोरे जाताना व व्यवहारिकता आणि सिद्धांत यातून निवड करण्याची बऱ्याचदा वेळ येते मात्र व्यवहार पाहतांना सैद्धांतिक होता आले तर जीवनाला बहार येईल असे मुनिश्री म्हणाले.
महावीर मार्ग आणि स्वाध्याय भवन आता साधुसंत येईपर्यंत सूनेच राहतील. या जाणिवेने सगळ्यांचीच मने व्याकूळ झाली होती. मुनीश्रींच्या कुसुंब्यात असण्याला अलौकिकाचे वरदान लाभले होते. नगरातील त्यांचे हे वास्तव्य म्हणजे पुण्य पावन सोहळा होता. पुज्यश्री गावातील विविध मार्गावरून जात असताना दुतर्फा भक्तगण आप आपल्या दारासमोर मुनीश्रींना हात जोडुन वंदन करीत होते. तर काही बाबतीत भक्तगण पुष्पवृष्टी, मंगल आरती ओवाळून, पादप्रक्षालन करून अर्घ चढवून उपस्थितजणघोषणा देत होते की “कुसुंबा वालों की क्या अभिलाषा कुसुंबा मे हो अगला चौमासा” आदी घोषणांनी कुसुंबा नगरी गजबजली होती. असे श्रद्धाळू नी आपले भाव प्रकट करून आनंद व्यक्त केले. दुसरीकडे त्यांच्या वियोगाने अंतकरण गलबलून आल्याची भावना भाविकांकडून व्यक्त झाल्या. असा कुसुंबा गावातील मानवी जीवनाचा पावित्र फुलविणारा ऐतिहासिक जैन चातुर्मास संपन्न झाल्याची नागरिकांत चर्चा ऐकावत होती.
तसेच पार्श्वनाथ सेवा समितीचे पद्मावती युवा मंचाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे सफलतेचे श्रेयाचे गौरव उद् गार अनेकांत बोलवा दिसून येत होता. अतिशय क्षेत्राचे विश्वस्त महेंद्र हिरालाल जैन, मयुर रिखब जैन, वालचंद रतनलाल जैन, पारस नवणीतलाल जैन, पंकज नगीनदास जैन, राहुल सुंदरलाल जैन, स्वप्नील महेंद्र जैन, रोशन रविंद्र जैन, राजेंद्र नवनीतलाल जैन, प्रतिक उल्हास जैन, गौरव उल्हास जैन, ओम राजेंद्र जैन,दीपक रविंद्र जैन, परम शितल जैन, वेदांत विपुल जैन, सुरेंद्र रतनलाल जैन, सम्यक राजेंद्र जैन, चिंतन संदीप जैन, सतिष वसंतिलाल जैन, चंदू शांतीलाल जैन, विपुल अशोक जैन, वर्धमान सुरेश जैन, अतुल हेमचंद जैन, प्रदीप माणकलाल जैन, किरण प्रेमचंद जैन, महावीर सुभाष जैन, प्रमोद पानाचंद जैन, राजेंद्र स्वरूपचंद जैन, मोहित जैन,अशोक शांतीलाल जैन, नवल जैन आदी सह पार्श्वनाथ सेवा समिती व पद्मावती युवा मंच यांनी सयोजन केले.