डांभुर्णी शिवारातील शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल वायर चोरी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या डांभुर्णी व प्रिंप्री शेत शिवारातून तसेच धरण परिसरातून ७० ते ८० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल वायरची चोरी झाली आहे. ही वायर चोरी झाल्यामुळे अगोदरच भारनियमनाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा नविन केबल वायर आणण्यासाठी आर्थिक झळ बसणार आहे.
केबल वायर चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणून तालुक्यात किंवा तालुक्यातील खेड्यापाड्यात किंवा बाहेरगावी कोणीही केबल वायर विकतांना आढळून आल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला खबर द्यावी अशी विनंती पिंपरी, डांभुर्णी येथील शेतकऱ्यांनी केली असून खबर देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही सांगितले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.