पाचोरा नगरपालिकेने मिल्लत नगर भागात रस्त्यावर टाकला मुरूम.
दिलीप जैन.(पाचोरा)
पावसाळा सुरु झाल्यापासून मिल्लत नगर भागात पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने या भागातील रस्त्यावर पाणी साचून दयनीय अवस्था झाली होती. तसेच डबके तयार झाले होते. यामुळे या परिसरातील रहिवाशांना रहदारीस अडथळा येत होता. ही समस्या सोडवण्यासाठी मिल्लत नगर रहिवाश्यांनी दिनांक २५ रोजी पाचोरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. संजीव भाऊ गोहिल व आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील. यांच्याकडे लेखी स्वरूपात समस्या मांडली होती.
याची दखल घेत आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील व नगराध्यक्ष मा.श्री. संजयजी गोहिल यांनी नगरपरिषदेच्या सी.ओ.मा.सौ.शोभाताई बाविस्कर यांना सुचना देऊन समस्या सोडवण्यासाठी सांगितले. लगेचच सी.ओ. मॅडम यांनी मिल्लत नगर परिसराची पहाणी करत रस्त्यावर मुरुम टाकणे कामी टेंडर काढून मोहीत पाटील व छोटू भाऊ चौधरी यांना काम देऊन कारवाई पूर्ण करत मिल्लत नगर भागात त्वरित मुरुम टाकल्याने या परिसरातील रहिवास्यांची समस्या सुटल्यामुळे त्यांनी आमदार साहेब, तसेच नगराध्यक्ष व सी.ओ. मॅडम यांचे आभार मानले तसेच या मुरुम टाकणे कामी नगरपरिषदचे प्रशांत कांडारे यांचे विशेष सहकार्य लाभले.