अंबे वडगाव येथे श्रीकृष्ण क्लिनिकचा शुभारंभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२१
अंबे वडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी जनार्दन कौतीक पाटील. या शेतकऱ्याच्या मुलाने अत्यंत बिकट परिस्थितीत शिक्षण घेत नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील बि.ए.एम.एस. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पैस्यामागे न धावता आपण या गावाचे, समाजाचे काही देणे लागतो अशी भावना उराशी बाळगून खेडेगावातील जनतेची अल्पदरात सेवा करण्याच्या हेतूने अंबे वडगाव येथील मुळ गावीच आज श्रीकृष्ण क्लिनिक सुरु केले.
या दवाखान्याचा शुभारंभ प.पू.प.म.आचार्य प्रवर श्री येळमकर नवे बाबाजी यांच्या शुभहस्ते पूजाविधी करुन श्रीकृष्ण क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले.
तत्प्रसंगी म.श्री.चक्रपाणी बाबा नवे,म.श्री.मंडळीक बाबा तसेच आश्रमातील भिक्षुक मंडळी तसेच गावातील प्रतिष्ठित सदभक्त उपस्थित होते
याच शुभ प्रसंगाचे औचित्य साधत सर्वांच्या साक्षीने डॉ.सचिन जनार्दन पाटील यांनी श्री नवे बाबा यांना निमित्त करून महानुभाव पंथाचा धर्मोपदेश घेतला. याप्रसंगी महंत श्री. चक्रपाणी बाबा नवे महंत श्री. मंडलिक बाबा व आश्रमातील भिक्षुक मंडळी कडून नवोदित डॉ.सचीन पाटील यांच्या कडून समाजसेवा,पंथसेवा घडावी असे आशीर्वाद प्राप्त करून घेतले.
याप्रसंगी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सामाजिक अंतर राखत डॉ.चेतन वाघ, डॉ. मुनिरखॉ पठाण, डॉ. शामकांत वाघ व मोजक्याच ग्रामस्थांचे उपस्थितीत हा उदघाटन सोहळा संपन्न झाला.