शेतीच्या वादातून भडगाव तालुक्यातील पळासखेड्यात गोळीबार; एक जखमी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०७/२०२१
भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे आज झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की,भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथे एकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले असून एक छोट्याशा गावात गोळीबार होत असल्याने व मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात अश्या बऱ्याच घटना घडल्यामुळे जळगाव जिल्ह्यात बिहारी राज सुरु झाले की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात असून या घटनेमुळे हा परिसर हादराला आहे.
प्राथमिक माहितीनुसार जमीनीच्या वादातून ही घटना घडली असून या गोळीबारात पळाखखेडा येथील शेतकरी अशोक शिवाजी पाटील हे जखमी झाले असल्याची प्रार्थमिक माहिती समोर येत आहे. आहे. या घटनेतील जखमी अशोक पाटील यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.
या घटनेतील जखमी अशोक पाटील यांनी दिलेल्या व जनतेतून कमिळालेल्या माहिती नुसार समजलेली माहिती अशी की अशोक पाटील आणि पळासखेडा येथील विजय दोधा पाटील यांचा रस्त्यावरून जुना वाद आहे. याच विषयावरून आज सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास जखमी अशोक पाटील व विजय पाटील यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. यात विजय दोधा पाटील यांनी त्यांच्याकडील पिस्तुल काढून अशोक पाटील यांच्यावर चार फैरी झाडल्या. यातील एक गोळी अशोक पाटीला यांना लागली असून यात ते जखमी झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.