*चौफेर व्यक्तिमत्वाचे उभरते नेतृत्व !- प्रवीण ब्राह्मणे*
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०७/२०२१
मागील २० वर्षांपासून आपल्या पत्रकारिता व समाजसेवेचा वसा हाती घेत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत झटणारे तसेच पाचोरा तालुक्यातच नव्हेतर महाराष्ट्राभर आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे मा.श्री.प्रवीणजी ब्राम्हणे सर आमच्या पत्रकारिता क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक यांंचा आज वाढदिवस या निमित्ताने धडाडीचे समाजसेवक मा.श्री. अनिल आबा येवले यांनी व्यक्त केलेले मनोगत सत्यजीतच्या माध्यमातून आपल्यासमोर.
आमचे मित्र प्रवीण ब्राह्मणे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या सुमारे वीस वर्षांपासून कार्यरत आहेत, गावकरीचे, लोकमत, सकाळ, लोकसत्ता आदी वर्तमान पत्रात काम करून आपल्या नावाचा कायम दबदबा राखत गेल्या चार वर्षापुर्वी त्यांनी पाचोरा येथून पीबिसी मातृभूमी नावाचे न्यूज चैनल सारख्या आव्हानात्मक क्षेत्रात पदार्पण करून आपल्या नावाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.दलित समाजातील या एकाउच्चविद्या विभूषित तरुणाने आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, अधिकारीवर्ग, पोलीस स्टेशन, नगरपालिका,कृषी, विज्ञान, व्यक्तिविशेष यासह अनेक प्रकारच्या विविधांगी बातम्या प्रकाशित करून आपले वेगळेपण सिद्ध करत पाचोरा व परिसराला पत्रकारितेचा नवा सकारात्मक आयाम दिला.
त्यांचा मृदू स्वभाव, आवाजातील मधुरता, हसरा चेहरा, सर्वांना मदत करण्याची भावना, स्पष्टवक्तेपणा आशा अनेक गुणांमुळे त्यांनी स्वतःचे लाखो चाहते निर्माण केले आहेत.प्रचंड जनसंपर्क ही त्यांची ताकत म्हणून पुढे आली आहे.याव्यतिरिक्त त्यांना समाजकारणाची व राजकारणाची आवड असून मागील काळात नगरपालिका निवडणुकीत त्यांना यशाने हुलकावणी दिली.मात्र आपली जिद्द कायम ठेवत त्यांनी पाचोरा पीपल्स बँकांच्या संचालक पदाची निवडणूक लढवत आपल्या व्यक्तिमत्वाचा चौफेरपणा सिद्ध केला. माननीय आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते थेट मुंबई गाठत हातावत शिवबंधन बांधत वेगळ्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करीत असतांनाच अप्पांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.अल्पावधीतच दलित समाजाच्या विविध मागण्यांची दखल घेत मोठा निधी समाजाला व प्रभागाला मिळवून देत त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. किंबहुना दलित समाजातील नेतृत्वाची पोकळी ते भरून काढतील असा आशावाद त्यांचेकडून समाज व्यक्त करताना दिसत आहे मात्र त्यांना कुठल्याही पदाची अपेक्षा नाही निस्वार्थपणे काम करणे हेच त्यांचे उद्दिष्ट असून आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !
*अनिल आबा येवले,पाचोरा*