सावखेडा येथील पिडीत कुंटूबीयांची जिल्हापरिषद सदस्य मधुकर काटे. यांनी घेतली भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील शेतकरी रमेश गुलाब परदेशी यांच्या घरालतगत खळयात साठवलेल्या कपासाला मागील आठवड्यात सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत जवळपास २५ क्विंटल कापूस जळुन खाक झाला.तसेच घरातील कपडेलत्ते व इतर संसारपयोगी वस्तू, घरसामान जळून खाक झाला.
आग लागल्याचे लक्षात येताच धुराचेल लोट व आराडाओरडा ऐकून सर्व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांसह पाचोरा अग्निशमन दलाने आटोकाट प्रयत्नातून आग आटोक्यात आली होती.
पण या आगीची तीव्रता एवढी भयावह होती आयुष्यभर कमावलेली घर व घरामधील सर्व साहित्य जळुन खाक झाले तसेचं कर्ज काढुनी पिकवलेले उत्पन्न पण उभ्या डोळ्यासमोर राख रांगोळी होतांनाची वाईट घटना कुटूंबियांना डोळ्यादेखत दिसत होती.
ही घटना घडल्यापासून परदेशी कुटुंब तणावाखाली आहे. झालेले नुकसान कसे भरून काढता येईल या विवंचनेत आहे.
हि घटना माहीत झाल्यावर जिल्हापरिषद सदस्य मधुकर काटे यांनी सावखेडा गाठत शेतकरी कुटुंबाची भेट घेतली व धीर दिला.【 या कुटूंबाला मदत मिळावी म्हणून मी शासनस्तरावर बोलून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले.】