आज शेंदुर्णी येथे हर घर तिरंगा जनजागृती मोहीमे अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२२
भारतीय स्वातंत्र्याला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी ज्ञात, अज्ञात क्रांती विरांचे, क्रांतीकारक, क्रांती नायकांचे तसेच या लढ्यात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे तसेच नवीन पिढीला ते ज्ञात व्हावे, देशभक्ती, देशाभिमान टिकून रहावा, स्वातंत्र्यासाठी घेतलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे, भारतीय नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना कायम टिकून रहावी यासाठी जनजागृती व्हावी या हेतूने शेंदुर्णी नगरपंचायतीचे वतीने आज दिनांक ३१ जूलै २०२२ रविवार रोजी हर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन पारस मंगल कार्यालयात सकाळी १० करण्यात आले आहे.
तरी या जनजागृती मोहीमेला शेंदुर्णी सह पंचक्रोशीतील लहान, थोर, जेष्ठ नागरिक, माता भगिनींनी तसेच शाळा, महाविद्यालय, विविध संघटना, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच हर घर तिरंगा या जनजागृती मोहीमेचे महत्त्व नवीन पिढीला पटवून देत आपला इतिहास कायम ठेवत आपण या देशाचे नागरिक आहोत देश सेवा हीच ईश्वर सेवा समजून देशहितासाठी उपस्थित रहावे असे आवाहन शेंदुर्णी नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे उपनगराध्यक्ष निलेश थोरात मुख्याधिकारी साजिद पिंजारी सर्व नगरसेवक यांनी केले आहे.