छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ समाजसेवीका पुजा पंडित यांना जाहीर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२१
जिजाऊ बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने देन्यात येनारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ पुरस्कार देन्यात येत आहे.हा पुरस्कार सोहळा दि.१९-०२-२०२१ रोजी.शिवजयंतीच्या पावन पर्वावर वैजापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करन्यात येनार आहे.
कलियुगात अवतरली पुन्हा पतीराजांना साथ देणारी समाजसेवीका सौ. पूजा सुमित पंडित सावित्री ही पूजा बेलपत्री परमेश्वराजवळ अर्पण केल्यानंतर देव पावतो ही कल्पना आहे मात्र नावात सौ पुजा सुमित पंडित नाव असलेली ही ताई सामान्य गृहिणी प्रमाणे संसाराच्या गाड्यात न अडकता अर्धांगिनी म्हणून शोभते कारण ही ताई धावली समाजसेवा करणाऱ्या आपले पतिराज समाजसेवक सुमित भाऊ पंडित यांच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचे व्रत पूर्ण करण्यात मदत करते. बेवारस मनोरुग्ण (महिलांना) अनेक आजारांच्या वा रोगांच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्या उपेक्षितांना माणूस म्हणून जीवनात आधार देणाऱ्या पतिराजांना पूर्ण मराठवाड्यात असलेल्या रुग्णालयात साथ दिली व कितीतरी मनोरुग्ण महिलांना येरवडा मेंटल हाँस्पीटल मध्ये कोर्टाचे आदेश घेवुन उपचारासाठी दाखल केले आहे. वेळेवर कितीही गर्भश्रीमंत असला तरी त्याला दोन वेळचे जेवण मिळवणे कसरत असते पण आपल्या कार्यक्षेत्रात बेटी बचाओ बेटी पढाओ,नारदिय किर्तनाच्या माध्यमातून गाव खेड्यात जाऊन लोकांच्या मानसिकता बदलावीनारा हा अवलिया.रक्तदान शिबीर,
रुग्णालयात रुग्णाची सेवा बेवारस नीराधारांच्या हाकेला धावनारे ज्याना जेवन नाही त्याची भुक भागवनारे सुमित भाऊ पंडित यांना.विषेश म्हणजे पत्नी सौ पुजा दररोज गोरगरीब रुग्णांना १५ ते २० जेवनाचे डबे पुरवते लाँकडाउन च्या काळामध्ये पुजा ने स्वतः १० कुंटल अन्य शीजवुन पाई जानाऱ्या मजुरांना व ज्याचा घरी चुल पेटत नव्हती त्याच्या घरी पतीराज्याच्या मदतीने त्याना वेळेवर अन्नदान केले होते. माणुसकी समुहाच्या माध्यमातून त्यानी ११०८०० रु रोख रक्कम प्रत्येकि पाई जानाऱ्या मजुरांना १०० रु प्रमाने खर्चासाठी दिले होते.व ८६००० हजार रु मेडिकल साहित्य पाई जानाऱ्या मजुरांना दिले होते. ची खंबीरपणे साथ काळीकुट्ट रात्र असली तरी शाशकिय रुग्णालयात जेवनाचे डबे पुरवनारी हि भुमिकन्या सौ पुजा पंडित. या पती राजाबरोबर समाजसेवेचे कार्य करणाऱ्या या समाजसेवी लढवय्या पुजा ला आतापर्यंत महाराष्ट्र विविध १६ पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे.संस्थापक अध्यक्ष अँडोकेट धनराज अंभोरे सचीव संतोष दोडे,कार्यक्रमाचे आयोजक
सुर्यकांत मोटे यांनी पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.समाजसेवीका सौ पुजा पंडित यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.