जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील नांद्रा ग्रामस्थांच्या समस्यां सोडवण्यासाठी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०७/२०२१
जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ह्या महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामांमुळे नांद्रा गावातुन जाणाऱ्या या रस्त्यामुळे रस्त्यावर विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. वारंवार निवेदन देऊन सुद्धा संबंधित ठेकेदार व महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत म्हणून नांद्रा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिनांक २८ बुधवार रोजी सकाळी १० वाजता नांद्रा बसस्थानकावर रस्तारोको आंदोलन करण्याचा पावित्रा घेतलेला आहे.
ग्रामपंचायतीने संबंधित विभागांना गेल्या वर्षभरापासून पत्रव्यवहार करुण विविध समस्या मांडलेल्या आहेत त्यात बसस्थानकावरील मुतारी बांधणे, शेत रस्ता तयार करणे, रस्त्याचे काम अपुर्ण असल्यामुळे रस्त्याचे पाणी दलीतवस्तीकडून गावात जाते. तेथे पाईप टाकून रस्ता तयार करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता तयार करणे, रस्त्यामुळे उचांवर गेलेल्या व्यवसायीकांच्या दुकानांसाठी रस्ता तयार करणे, विष्णूदास महाराजांच्या मठाकडे जाणारा रस्ता पाईप टाकून रस्ता तयार करणे, नांद्रा बसस्थानक व माध्यमिक विद्यालय जवळ गतिरोधक बनवणे, गावातील गट न.३८९/२ मधुन संबंधित कंपनीने मोठ्या प्रमाणावर मुरुम उचललेला आहे. व त्या ठिकाणी खराब मटेरीयल आणून टाकले आहे ते उचलून नेणे,गावाजवळील ५०० मिटर रस्ता हा वळण व शेती अधिग्रहणामुळे अपुरा आहे. तो विषय मार्गी लावावा अशा असंख्य समस्या दुर करण्यासाठी नांद्रा ग्रामपंचायत व ग्रामस्थ दिनांक २८ बुधवार रोजी सकाळी १० वाजता रस्तारोको आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाबाबत मा.नितिनजी गडकरी केंद्रीय दडण वळण मंत्री दिल्ली,जिल्हाधिकारी जळगाव, आमदार किशोर पाटील पाचोरा भडगाव, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग धुळे, पोलिस निरीक्षक पाचोरा यांना निवेदन देण्यात आलेले आहेत.